Airtel 5G: Xiaomi India आणि Airtel मध्ये पार्टनरशिप, ग्राहकांना मिळेल उत्तम 5G सर्व्हिस
Xiaomi India आणि Airtel ने केली भागीदारी
भागीदारीबद्दल Xiaomi इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसरने केली घोषणा
Xiaomi च्या स्मार्टफोन्समध्ये मिळणार 5G सेवा
स्मार्टफोन ब्रँड Xiaomi India आणि दूरसंचार कंपनी Bharti Airtel यांनी बुधवारी 5G Plus सुधारण्यासाठी भागीदारी केली आहे. आता Xiaomi आणि Redmi स्मार्टफोन वापरकर्त्यांना पूर्वीपेक्षा चांगली Airtel 5G सेवा मिळेल. वापरकर्ते आता अखंड व्हिडिओ कॉलिंग, क्लाउडवर लॅग फ्री गेमिंग आणि Xiaomi आणि Redmi 5G मॉडेलवर हाय स्पीड डेटा अपलोड आणि डाउनलोडचा अनुभव मिळेल.
हे सुद्धा वाचा : Oppo च्या दिवाळी हॉट डीलमध्ये बंपर ऑफरसह मिळतोय 5G फोन, तब्बल 12,000 रुपयांची सूट
अल्ट्राफास्ट एअरटेल 5G प्लस कनेक्टिव्हिटीचा आनंद घेण्यासाठी वापरकर्त्यांना फक्त त्यांच्या फोनच्या नेटवर्क सेटिंग्जवर जाणे आणि त्यांचे प्राधान्य असलेले नेटवर्क Airtel 5G मध्ये बदलणे आवश्यक आहे. Xiaomi India आणि Bharti Airtel त्याची मागील दोन वर्षांपासून अनेक प्रोडक्ट्सवर एकत्रित टेस्टिंग करत आहेत.
या भागीदारीची घोषणा करताना Xiaomi इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अनुज शर्मा म्हणाले, ''Xiaomi India ने नेहमीच लोकांसाठी टेक्नॉलॉजीचे लोकशाहीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे आमच्या वापरकर्त्यांच्या भविष्यातील गरजा सहज पूर्ण होतात.''
Xiaomi च्या या स्मार्टफोन्समध्ये 5G सेवा उपलब्ध असेल
Xiaomi India ने वापरकर्त्यांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी विविध फ्रिक्वेन्सी बँडवर अनेक शहरांमध्ये 5G फील्ड ट्रायल आयोजित केल्या आहेत. Xiaomi 12 Pro, Mi 11 Ultra, Xiaomi 11T Pro, Xiaomi 11 Lite NE 5G, Xiaomi 11i हायपरचार्ज, Xiaomi 11i, Mi 11X Pro, Mi 11X, Mi 10T Pro, Mi 10T इ. Xiaomi युजर्स आपल्या आवडत्या नेटवर्कशी बदलून आपल्या आवडत्या कनेक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतात.
परवडणाऱ्या सेगमेंटबद्दल बोलायचे झाल्यास, Redmi K50i, Redmi 11 Prime 5G, Redmi Note 11 Pro+ 5G, Redmi Note 11T 5G, आणि Redmi Note 10T 5G स्मार्टफोन्सना Airtel 5G Plus सेवेचा लाभ मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile