Exciting! Xiaomi Bundle Offerमध्ये स्मार्टफोन, इयरबड्स, स्मार्टवॉच आणि पॉवर बँक फक्त 19,999 रुपयांमध्ये, Limited टाइम डील

Updated on 10-Oct-2023
HIGHLIGHTS

Xiaomi ने देखील सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे.

ऑफरमध्ये Redmi Note 12 5G, Redmi Buds 4 Active, Redmi Watch 3 Active आणि Mi Pocket Power Bank Pro यांचा समावेश

ऑफरअंतर्गत चार उपकरणे किमान 19,999 रुपयांना खरेदी केली जाऊ शकतात.

Amazon आणि Flipkart प्रमाणे Xiaomi ने देखील सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. कंपनीने एक बंडल ऑफर आणली आहे, ज्या अंतर्गत 4 प्रोडक्ट्स कमी किमतीत खरेदी करता येतील. कंपनीचा हा सणाचा करार आहे, जो मर्यादित काळासाठी उपलब्ध असेल. या बंडल ऑफरमध्ये Redmi Note 12 5G, Redmi Buds 4 Active, Redmi Watch 3 Active आणि Mi Pocket Power Bank Pro यांचा समावेश आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, या चारही उपकरणांची किंमत 33,696 रुपये इतकी आहे. पण ऑफरअंतर्गत ती किमान 19,999 रुपयांना खरेदी केली जाऊ शकतात. कंपनीने ही ऑफर देऊन कनेक्टेड इकोसिस्टम तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. ही सर्व उपकरणे एकमेकांशी सहज जोडली जातात.

Redmi Note 12 5G

फोनमध्ये सुपर AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि हा 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेजसह येतो. यात 48-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेन्सर आहे. एक 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर देखील आहे. फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जरला सपोर्ट करते.

redmi note 12 5g

Redmi Buds 4 Active

Redmi Buds 4 Active 12mm बास प्रो ड्रायव्हर्ससह येतात. बड्सची बॅटरी लाईफ 30 तासांपर्यंत आहे. त्याबरोबरच, ENC फीचर देण्यात आले आहे. यात गुगल फास्ट पेअर फीचरसह वन टॅप सुविधा आहे. हे फास्ट चार्जिंग फिचरसह येते आणि त्याला IPX4 रेटिंग देखील देण्यात आली आहे.

Mi Pocket Power Bank Pro

Mi Pocket Power Bank Pro मायक्रो USB कनेक्टरसह येते. यामध्ये 10000 mAh ची बॅटरी आहे. यात फास्ट चार्जिंग फीचर आहे. नावावरून तुम्हाला कळलंच असेल की, हे खूप कॉम्पॅक्ट आहे आणि खिशात सहज बसेल.

Redmi Watch 3 Active

या स्मार्टवॉचमध्ये 1.83 इंच लांबीचा मोठा डिस्प्ले आहे. हे तुमच्या फोनसह Mi फिटनेस App द्वारे कनेक्ट केले जाऊ शकते. यामध्ये 200 हून अधिक वॉच फेस देण्यात आले आहेत. यात तब्बल 12 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. यामध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड देखील उपलब्ध आहेत आणि ही वॉच 5ATM वॉटरप्रूफ आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :