सिमचा एक कोपरा का कापला जातो? क्वचित लोकांना माहिती खरे कारण, वाचा सविस्तर

Updated on 14-Mar-2023
HIGHLIGHTS

SIM चे फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का ?

SIM चा एक कोपरा कापलेला का असतो ?

यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का ?

जेव्हापासून आपण फोन पाहिला तेव्हापासून सिम नावाचा प्रकारदेखील पुढे आला आहे. सिमचा वापर वर्षानुवर्षे होत आहे, पण त्याच्याशी संबंधित प्रश्न क्वचितच कोणाच्या मनात आले असतील. सिमचा एक कोपरा कापलेला तुम्ही पाहिला असेल. पण या मागचे कारण काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल माहिती तर हा लेख पूर्ण वाचा… 

हे सुद्धा वाचा : दररोज 2.5GB डेटा, कॉलिंग आणि दीर्घकाळ वैधतेसह JIOचा अप्रतिम प्लॅन, किंमत फक्त…

SIM चे फुल फॉर्म

 SIM चे फुल फॉर्म म्हणजे Subscriber (S) Identity (I) Module (M) असे आहे. हे कार्ड ऑपरेटिंग सिस्टम (COS) चालवणारे एकात्मिक सर्किट आहे,, जे इंटरनॅशनल मोबाइल सब्सक्राइबर आयडेंटिफिकेशन (IMSI) नंबर आणि त्याच्याशी संबंधित Key सुरक्षितपणे संग्रहित करतो.

हा क्रमांक आणि Key मोबाइल टेलिफोनी उपकरणांवर सदस्य ओळखण्यासाठी आणि प्रमाणित करण्यासाठी वापरली जातात.

SIM चा एक कोपरा कापलेला का असतो ?

मोबाइल फोनमध्ये सिम योग्य ठिकाणी ठेवता यावे, म्हणून सिमचा एक कोपरा कापला जातो. सिम उलटे आहे की सरळ आहे, हे ओळखण्यासाठी सिमची रचना अशा प्रकारे केली जाते. लोकांनी सिम उलटे ठेवले तर त्याची चिप खराब होण्याचा धोका असतो.

जर सिमकार्डवर कटची खूण नसती तर ते मोबाईल फोनमध्ये नीट घालणे, अवघड झाले असते. आपण मोबाईल फोनमध्ये कधी कधी सिम कार्ड चुकीच्या बाजूला ठेवून देतो, पण कटद्वारे ते योग्य ठिकाणी ठेवता येते. मोबाइल फोनमध्ये वापरल्या जाणार्‍या सिम कार्डची रुंदी 25 मिमी, लांबी 15 मिमी आणि जाडी 0.76 मिमी असते. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :