Tips : कोणती Power Bank खरेदी करावी? कन्फ्युजन दूर करण्यासाठी लगेच ही बातमी वाचा

Tips : कोणती Power Bank खरेदी करावी? कन्फ्युजन दूर करण्यासाठी लगेच ही बातमी वाचा
HIGHLIGHTS

पॉवरबँक खरेदी करताना पुढील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

डबल कॅपेसिटीची बॅटरी निवडा

पॉवर बँकमध्ये LED इंडिकेटर असणे आवश्यक

 स्मार्टफोन, टॅब्लेट आणि इतर गॅझेट्सचे फिचर्स दिवसेंदिवस अधिक चांगली होत असली तरी, बॅटरी लाईफ  आजही एक मोठी समस्या आहे. स्मार्टफोनवरील वाढत्या निर्भरतेमुळे पॉवर बँकची व्हॅल्यू वाढली आहे. आपल्या फोनची बॅटरी संपली तर अस्वस्थतेची भावना निर्माण होते. अशा परिस्थितीत आजूबाजूला चार्जिंगची व्यवस्था नसेल, तर अशा परिस्थितीत पॉवर बँक कामी येते.

हे सुद्धा वाचा : UPI टिप्स : तुमचा फोन हरवला तर UPI खाते निष्क्रिय कसे कराल ? जाणून घ्या सोपा मार्ग

तुम्ही चांगल्या पॉवर बँकेत गुंतवणूक करत आहात, याची खात्री करून घेणे फार महत्वाचे आहे. बाजारात विविध आकार, क्षमता, रंग आणि कंपन्यांच्या पॉवर बँक्सच्या उपस्थितीमुळे, आपल्या स्मार्ट गॅझेटसाठी कोणती पॉवर बँक सर्वोत्तम आहे, हे ठरवणे थोडे कठीण होते. या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला एक उत्तम पॉवर बँक मिळण्यास मदत होईल.

डबल कॅपेसिटीची बॅटरी निवडा

पॉवर बँक खरेदी करताना त्याची बॅटरी कॅपेसिटी तपासा. पॉवरबँकची mAh जितकी जास्त असेल तितकी डिव्हाइसची चार्जिंग क्षमता जास्त असेल. पॉवर बँक खरेदी करताना, त्याचा आउटपुट व्होल्टेज तुमच्या डिव्हाइसशी जुळतो का ते तपासा. चार्जरचे आउटपुट व्होल्टेज चार्ज होत असलेल्या डिव्हाइसपेक्षा कमी असल्यास, ते उत्तम प्रकारे कार्य करणार नाही. म्हणजेच जर तुमच्या गॅजेटची बॅटरी क्षमता 1,500 mAh असेल, तर तुम्ही 3,000 mAh क्षमतेची पॉवर बँक घ्यावी.

LED इंडिकेटर असणे आवश्यक 

पॉवर बँकमध्ये LED इंडिकेटर असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातून अनेक गोष्टींची माहिती मिळते. यामुळे बॅटरी लेव्हल आणि चार्जिंग स्टेटसबद्दल माहिती मिळेल. त्यामुळे क्लियर LED इंडिकेटर लाइट असलेली पॉवर बँक खरेदी करा.

High Grade Lithium-polymer Battery  निवडा

गॅजेट्सचा विचार केला तर सुरक्षिततेकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अनेक लोक रात्री झोपताना स्मार्टफोन चार्ज करतात, ज्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. कमी कॉलिटीचे लिथियम-पॉलिमर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात, कारण जास्त चार्जिंगमुळे या पॉवर सेलचा स्फोट देखील होऊ शकतो.

केबल कॉलीटी 

चार्जिंग टाइम केबलच्या गुणवत्तेनुसार निर्धारित केला जातो. याशिवाय उच्च दर्जाची केबल तुमच्या डिव्हाइसला जास्त गरम होण्यापासून वाचवतात. तुमच्या पॉवर बँकसोबत येणारी केबल चांगल्या दर्जाची असावी हे लक्षात ठेवा. तसेच पॉवर बँकसोबत येणारी केबल ही गॅजेट्स चार्ज करण्यासाठीच वापरावी.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo