सध्या एक नवीन WhatsApp स्कॅम मार्केटमध्ये आला आहे.
हा स्कॅम तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आधीच सेव्ह असलेल्या काँटॅक्टपासून सुरू होतो.
नव्या WhatsApp स्कॅमपासून सावध कसे राहावे? ते जाणून घेऊयात
WhatsApp New Scam: दिवसेंदिवस स्कॅम्स आणि फसवणुकीची प्रकरणे वाढतच जात आहे. आता बाजारात एक नवीन घोटाळा आला आहे. जर तुम्ही या घोटाळ्याला बळी पडलात तर तुमचे संपूर्ण WhatsApp अकाउंट हॅक केले जाऊ शकते. हा स्कॅम तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आधीच सेव्ह असलेल्या काँटॅक्टपासून सुरू होतो. हॅकर तुमच्या मित्राकडून तुम्हाला मेसेज करून OTP विचारेल.
जर तुम्ही हा OTP फॉरवर्ड केला तर, तुमचे WhatsApp अकाउंट हॅक होईल आणि हॅकर तुमचा संवेदनशील डेटा सहजपणे ऍक्सेस करू शकतो. या स्कॅमअंतर्गत, हॅकर्स तुमचे व्हॉट्सऍप अकाउंट हॅक करतात आणि त्याद्वारे तुमच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना मेसेज पाठवून पैशाची मागणी करू शकतात. एवढेच नाही तर, ते तुमचा सर्व वैयक्तिक डेटा जसे की संपर्क, फोटो, व्हिडिओ, UPI व्यवहार इत्यादींवर नियंत्रण ठेऊ शकतो.
नव्या स्कॅमपासून ‘अशा’प्रकारे सावध रहा.
जर तुम्हाला तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीकडून असा संदेश मिळाला तर सर्वप्रथम त्यांना फोन करा आणि त्याबद्दल विचारपूस करा.
तसेच, टू- स्टेप व्हेरिफिकेशन करा. > यासाठी व्हॉट्सऍप सेटिंग्जमध्ये जा. > त्यानंतर अकाउंट ऑप्शनवर टॅप करा. > यानंतर, टू-स्टेप व्हेरिफिकेशन पर्याय ऑन करा. > आता सहा अंकी पिन तयार करा आणि तो कन्फर्म करा.
कसा होतो हा स्कॅम?
सर्वप्रथम हॅकर तुम्हाला तुमच्या मित्रांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नंबरवरून व्हॉट्सऍपवर मॅसेज पाठवेल.
या मेसेजद्वारे ते तुम्हाला सांगतील की त्यांनी चुकून तुमच्या नंबरवर OTP पाठवला आहे.
यानंतर ते तुमच्याकडून तो OTP मागतील. मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या नंबरवरून येणारे असे मेसेज तुम्ही गांभीर्याने घेत नाही. चुकून OTP त्यांना पाठवू शकता.
जर तुम्ही त्यांना तो OTP दिला, तर हॅकर तुमच्या WhatsApp वर पूर्ण नियंत्रण मिळवण्यास सक्षम असेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.