Aadhar Card हे तुमच्याकडे असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांमधून एक आहे. तुम्हाला माहिती आहे की, आधार कार्डशिवाय तुमची महत्त्वाची सर्व कामे असून राहू शकतात. म्हणून आधार कार्ड हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अशात जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर? तर पुढे काय? आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमचे आधार कार्ड हरवले तर काय करावे हे आम्ही तुम्हाला या लेखात अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहोत.
आधार कार्ड हरवल्यास, दुसरे आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. दुसरे आधार कार्ड तुम्ही घरबसल्या ऑनलाईन डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यात अडचण येत असेल, तर आम्ही तुम्हाला दुसऱ्या आधार कार्डसाठी ऑफलाइन अर्ज कसा करायचा, याची देखील माहिती देणार आहोत.
तुमचे आधार कार्ड हरवल्यास, तुम्ही नवीन कार्ड ऑनलाइन डाउनलोड करू शकता. यासाठी तुमच्याकडे आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.
यानंतर वर सांगितलेल्या प्रक्रियेनुसार आधार कार्ड डाउनलोड करा.
तुम्हाला डुप्लिकेट आधार कार्डसाठी आधार केंद्रावर जावे लागेल. तुमच्या जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जा आणि तेथे तुम्हाला एक फॉर्म मिळेल, त्यात आवश्यक तपशील भरा. यासाठी तुम्हाला तुमचा ID प्रूफ आवश्यक असेल. त्यानंतर, तुमचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण केले जाईल.
यासह तुम्ही नवीन आधार कार्डसाठी विनंती करू शकता. यासोबतच तुम्ही तुमचा मोबाईल नंबरही रजिस्टर करू शकता. याच्या मदतीने तुम्ही भविष्यात ऑनलाइन आधार सेवेचा लाभ घेऊ शकाल. काही दिवसात तुमचे आधार कार्ड होम पोस्टद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचेल.