Important! Aadhar Card हरवल्यास काय करावे? येथे बघा स्टेप बाय स्टेप सर्वात सोपी प्रक्रिया। Tech News 

Important! Aadhar Card हरवल्यास काय करावे? येथे बघा स्टेप बाय स्टेप सर्वात सोपी प्रक्रिया। Tech News 
HIGHLIGHTS

Aadhar Card हे तुमच्याकडे असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांमधून एक आहे.

आधार कार्ड हरवल्यास दुसरे आधार कार्ड तुम्ही घरबसल्या ऑनलाईन डाउनलोड करू शकता.

आम्ही तुम्हाला दुसऱ्या आधार कार्डसाठी ऑफलाइन अर्ज कसा करायचा, याची देखील माहिती देणार आहोत.

Aadhar Card हे तुमच्याकडे असलेल्या महत्त्वाच्या कागदपत्रांमधून एक आहे. तुम्हाला माहिती आहे की, आधार कार्डशिवाय तुमची महत्त्वाची सर्व कामे असून राहू शकतात. म्हणून आधार कार्ड हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अशात जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल तर? तर पुढे काय? आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुमचे आधार कार्ड हरवले तर काय करावे हे आम्ही तुम्हाला या लेखात अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहोत.

आधार कार्ड हरवल्यास, दुसरे आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. दुसरे आधार कार्ड तुम्ही घरबसल्या ऑनलाईन डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यात अडचण येत असेल, तर आम्ही तुम्हाला दुसऱ्या आधार कार्डसाठी ऑफलाइन अर्ज कसा करायचा, याची देखील माहिती देणार आहोत.

Aadhar Card

Aadhar Card हरवल्यास ‘अशा’प्रकारे डाउनलोड करा.

तुमचे आधार कार्ड हरवल्यास, तुम्ही नवीन कार्ड ऑनलाइन डाउनलोड करू शकता. यासाठी तुमच्याकडे आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar ओपन करा.
  • येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरावा लागेल आणि ‘सेंड OTP’ वर क्लिक करावे लागेल.
  • पुढील पेजवर तुम्हाला OTP सत्यापित करावा लागेल आणि ‘डाउनलोड’ वर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुमचे आधार कार्ड काही सेकंदात डाउनलोड होईल.

जर तुमच्याकडे आधार क्रमांक नसेल तर काय करावे?

  • सर्वप्रथम तुम्हाला आधारच्या अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/retrieve-eid-uid वर जावे लागेल.
  • येथे तुम्हाला आधार क्रमांक निवडावा लागेल, नोंदणीकृत मोबाइल आणि कॅप्चा कोड भरा आणि ‘सेंड OTP’ वर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो सबमिट केल्यावर तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल.

यानंतर वर सांगितलेल्या प्रक्रियेनुसार आधार कार्ड डाउनलोड करा.

ऑफलाईन डुप्लिकेट आधार कार्ड बनवण्यास काय करावे?

तुम्हाला डुप्लिकेट आधार कार्डसाठी आधार केंद्रावर जावे लागेल. तुमच्या जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जा आणि तेथे तुम्हाला एक फॉर्म मिळेल, त्यात आवश्यक तपशील भरा. यासाठी तुम्हाला तुमचा ID प्रूफ आवश्यक असेल. त्यानंतर, तुमचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण केले जाईल.

यासह तुम्ही नवीन आधार कार्डसाठी विनंती करू शकता. यासोबतच तुम्ही तुमचा मोबाईल नंबरही रजिस्टर करू शकता. याच्या मदतीने तुम्ही भविष्यात ऑनलाइन आधार सेवेचा लाभ घेऊ शकाल. काही दिवसात तुमचे आधार कार्ड होम पोस्टद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo