Ghibli Anime Style फोटोजने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ! अगदी Free मध्ये बनवा तुमची कार्टून इमेज

Ghibli Anime Style फोटोजने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ! अगदी Free मध्ये बनवा तुमची कार्टून इमेज
HIGHLIGHTS

सध्या Ghibli anime Style सर्वाधिक चर्चेचा विषय बनली आहे.

नव्या टूलद्वारे युजर्स आकर्षक फोटोज बनवतायेत, जे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

ब्लिंकिंटच्या एका उत्पादन व्यवस्थापकाने नवीन टूल वापरून काही बॉलिवूड सीन्स देखील तयार केले आहेत.

जगप्रसिद्ध OpenAI ने अलीकडेच त्यांचे नवीन इमेज जनरेशन टूल GPT-4o लाँच केले आहे. याद्वारे आता लोक आता असेल आकर्षक फोटोज बनवतायेत, जे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ही नवी प्रणाली अगदी मजेशीर आहे, काही लोक त्यांच्या आवडत्या इमेजेस आर्टमध्ये कन्व्हरर्ट करत आहेत. तर, अनेक लोक वेगवेगळ्या व्हायरल फोटोंना ऍनिमे स्टाईलमध्ये रूपांतरित करत आहेत. यामुळे, Ghibli anime Style सर्वाधिक चर्चेचा विषय बनली आहे. OpenAI चे हे फिचर खूप पसंत केले जात आहे.

Also Read: महागड्या Realme फोनवर तब्बल 9000 रुपयांचा Discount, 32MP सेल्फी कॅमेरासह भारी फीचर्स उपलब्ध

Ghibli Anime Style काय आहे?

Ghibli पोर्ट्रेट हा एक अतिशय विशिष्ट प्रकारचा फोटो आहे. हे घिबली स्टुडिओ स्टुडिओमध्ये बनवले आहे. अहवालानुसार, आजकाल अ‍ॅनिमे खूप लोकप्रिय होत आहे. Ghibli हा देखील एक प्रकारचा अ‍ॅनिमे आहे. जेव्हापासून लोकांना Ghibli Anime Style बद्दल माहिती मिळाली आहे, तेव्हापासून हे लोकप्रिय होत चालले आहे. हे नवे फिचर आल्यापासून युएजर्स त्यांचे कुटुंब, मित्र आणि व्हायरल इमेजेस Ghibli पोर्ट्रेटमध्ये रूपांतरित करत आहेत.

How to create Ghibli anime style portraits for free without chatgpt

महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कुठलेही सबस्क्रिप्शन न घेताही घिबली स्टाईल ट्रेंडमध्ये सामील होऊ शकता. तुम्ही तुमचे स्वतःचे अ‍ॅनिमे पोर्ट्रेट मोफत तयार करू शकता. ते सोशल मीडियावर पोस्ट करू शकता. यासाठी तुम्ही Grok AI, InsMind सारखे इतर AI टूल्स वापरू शकता.

केवळ युजर्सच नाही तर, Zomato आणि Blinkit सारख्या कंपन्या देखील Ghibli इमेजेस तयार करत आहेत आणि सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. ब्लिंकिंटच्या एका उत्पादन व्यवस्थापकाने नवीन साधन वापरून काही बॉलिवूड सीन्स देखील तयार केले आहेत. यासह हे Ghibli Anime Style फोटोज सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत.

‘अशा’ प्रकारे बनवा फोटोज

Grok AI हे एक टूल आहे, जे घिबली स्टाईलमध्ये इमेजेस तयार करू शकते. तुम्हाला फक्त तुमचा फोटो अपलोड करून ग्रोकला तो अ‍ॅनिमेसारखा बनवायला सांगायचा आहे. यासह, तुम्ही InsMind जो एक फ्री AI फिल्टर देतो, याचा देखील वापर करू शकता. हे Grok पेक्षा घिब्लीचा मूड चांगल्या प्रकारे कॅप्चर करतो. फक्त तुमचा फोटो अपलोड करा, फिल्टर लावा आणि तुमचा आकर्षक घिबली लूक तयार होईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo