भारतात किरकोळ वापरासाठी पहिले Digital Rupee पायलट 1 डिसेंबर रोजी SBI, HDFC बँक आणि ICICI बँकेसह पाच बँकांसह लॉन्च करण्यात आले. या बँका व्यवहारांसाठी डिजिटल वॉलेटद्वारे आभासी चलन (व्हर्च्युअल करन्सी) पुरवतात.
हे सुद्धा वाचा : 300 रुपयांच्या आत JIO, AIRTEL, VI आणि BSNL चे सर्वोत्तम प्लॅन्स बघा
1 नोव्हेंबर 2022 रोजी केंद्रीय बँकेने होलसेल बाजारासाठी डिजिटल रुपी पायलट प्रोजेक्ट लाँच केला.
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निवेदनानुसार, डिजिटल रुपयाचा वापर आता वापरल्या जाणाऱ्या लीगल मनीची डिजिटल प्रत म्हणून केला जाईल, त्याबरोबरच, याला क्रिप्टो करन्सी आणि लीगल मनीप्रमाणेच मान्यता दिली जाईल.
e-रुपी (Digital Rupee) हे एक डिजिटल टोकन आहे जे पैशाप्रमाणे वापरले जाते. आता वापरल्या जाणार्या नाण्यांना आणि कागदी पैशांना जी मान्यता दिली जाते, तीच ओळख e-रुपी ला देखील दिली जाईल. या नवीन उपक्रमात सहभागी बँकांकडून ग्राहकांच्या फोन आणि इतर उपकरणांना डिजिटल वॉलेट देण्यात येणार असून, वापरकर्ते डिजिटल चलनाने व्यवहार करू शकतील.