आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च ग्रुप OpenAI ने चॅटबॉट ' ChatGPT ' लाँच केला आहे. हा चॅट बॉट संवादावर आधारित आहे, जो मानवी भाषा आणि वर्तन समजून प्रतिसाद देण्यास सक्षम आहे. त्याच्या विशेष क्षमतेमुळे आगामी काळात हा Google ला जबरदस्त टक्कर देईल, असे बोलले जात आहे.
हे सुद्धा वाचा : Airtel World Pass plans: सुरुवातीची किंमत 649 रुपये, जाणून घ्या काय आहे खास ?
ChatGPT सांगायचे झाले, तर हा एक चॅट बॉट आहे. ज्यामध्ये वापरकर्ते प्रश्न विचारू शकतात. पण, इतर अनेक चॅट बॉट्स देखील उत्तर देण्यास सक्षम आहेत. परंतु, ते फक्त काही प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. जसे की, ज्या विषयासाठी ते डिझाइन केले आहेत, त्याबद्दल ते उत्तरे देतील. तर, ChatGPT या सर्वांपेक्षा खूप वेगळे आहे, जे AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापरून सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आहे. यात टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल अशा दोन्ही प्रश्नांची उत्तरे समाविष्ट आहेत.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांची कंपनी Open AI ने तयार केलेली ChatGPT 3.5 लँग्वेज मॉडेलवर आधारित आहे. हे अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहे की, ते वापरकर्त्यांना वाचन आणि लेखनापासून सर्व प्रकारच्या कामांमध्ये मदत करेल. तसेच, हा अनावश्यक किंवा काल्पनिक प्रश्न देखील समजतो. म्हणजेच, ChatGPT चे सेल्फ-सेन्सॉरिंग देखील उत्कृष्ट आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे समर्थित चॅट बॉट ChatGPT वापरण्यास अत्यंत सोपे आहे. यासाठी, https://chat.openai.com ला भेट देऊन लॉगिन/साइन अप केल्यानंतर दिसणार्या चॅट विंडोमधून वापरकर्ते चॅटजीपीटीमध्ये प्रवेश करू शकतात.
https://twitter.com/samczsun/status/1598564871653789696?ref_src=twsrc%5Etfw
सोशल मीडियावर असे अनेक मजकूर आहेत, ज्यात लोकांनी ChatGTP शी बोलल्यानंतर यातून आलेल्या उत्तरांबद्दल सांगितले आहे. लेखक जेफ यांग यांनी ट्विट केले आहे की, त्यांनी ChatGTPला मांजरीच्या शैलीत जिरो पॉइंट एनर्जीचे तपशीलवार वर्णन करण्यास सांगितले आहे.
यावर, ChatGTP ने उत्तर दिले, "म्याऊ, म्याऊ, म्याऊ, म्याऊ! जिरो पॉईंट उर्जा ही त्या उर्जेच्या प्रमाणात असते जी नेहमी अस्तित्वात असते, जरी वस्तू स्थिर किंवा विश्रांती अवस्थेत असली तरी". याचा अर्थ असा होतो की, ChatGTP ने शक्य तितक्या चांगल्या प्रकारे जिरो पॉइंट एनर्जी स्पष्ट केली आहे.