OTT this Weekend : या वीकेंडला OTT वर ‘हे’ चित्रपट-सिरीज बघा, हॉरर आणि ऍक्शन कंटेंटचा आस्वाद घ्या

OTT this Weekend : या वीकेंडला OTT वर ‘हे’ चित्रपट-सिरीज बघा, हॉरर आणि ऍक्शन कंटेंटचा आस्वाद घ्या
HIGHLIGHTS

वीकेंडला OTT वर पुढील चित्रपट-सिरीज बघा

यादीमध्ये शूरवीर, रेसिडेंट एव्हिल सारखे चित्रपट आणि सिरीज

यादीमध्ये हॉरर आणि ऍक्शन ड्रामा कंटेंट उपलब्ध

नवीन आठवड्याच्या सुरुवातीसह, विविध भाषा आणि जॉनरचे कंटेंट विविध OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जातात. यामुळे प्रेक्षकवर्ग नव्या आठवड्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असतो. OTT ची वाढती लोकप्रियता पाहता निर्माते देखील प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सादर करत असतात. चला तर मग जाणून घेऊया या आठवड्यात OTT वर कोणत्या नवीन आणि रोमांचक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.

हे सुद्धा वाचा : सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन! अतिशय कमी किमतीत मिळेल दररोज 3GB डेटा, मोफत कॉलिंग आणि SMS चा लाभ

व्हॅली ऑफ डेथ 

ऍक्शन आणि थ्रिलरने परिपूर्ण असलेला 'व्हॅली ऑफ डेथ' हा चित्रपट सोमवारी म्हणजेच 11 जुलै रोजी प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहायला मिळेल.

कुंग फू पांडा ड्रॅगन नाइट

कुंग फू पांडाच्या चाहत्यांसाठी आता या फ्रँचायझीची नवीन सिरीज रिलीज करण्यात आली. फ्रँचायझी कुंग फू पांडा द ड्रॅगन नाइटची पुढील सिरीज 14 जुलैपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर उपलब्ध आहे.

रेसिडेंट एव्हील 

हॉरर आणि थ्रिलरने भरलेला रेसिडेंट एव्हिल हा आणखी एक नेटफ्लिक्स चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला. या हॉरर फ्रँचायझीचा नवीन भाग 14 जुलैपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर उपलब्ध झाला आहे.

शूरवीर

अ‍ॅक्शन-पॅक्ड मिलिटरी ड्रामा सिरीज शूरवीर या आठवड्यात OTT वर रिलीज होणार आहे. भारताच्या स्पेशल टास्क फोर्सवर आधारित, ही सिरीज Disney Plus Hotstar वर प्रसारित होईल. तुम्हालाही देशभक्ती आणि ऍक्शन असलेली ही सिरीज असेल, तर तुम्ही 15 जुलै म्हणजे आजपासून पाहू शकता. ही सिरीज हिंदीसह 6 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हे सुद्धा वाचा : Oppo Pad Air: भारतात लाँच होणार Oppo चा नवीन टॅबलेट, तारीख जाहीर, जाणून घ्या फीचर्स

जादूगर

कोटा फॅक्टरी आणि पंचायत यांसारख्या सिरीजमधून प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता जितेंद्र कुमार आता लवकरच चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्याचा जादूगार चित्रपट या आठवड्यात म्हणजेच 15 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

वाशी

कीर्ती सुरेश आणि टोविनो थॉमस स्टारर फिल्म कोर्टरूम ड्रामा फिल्म 'वाशी' थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर आता OTT वर देखील येणार आहे. विष्णू जी राघव दिग्दर्शित हा चित्रपट 17 जुलैपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

फँटसी आयलँड 

प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी 'फँटसी आयलंड' ही वेब सिरीज देखील या आठवड्यात OTT वर प्रदर्शित झाली आहे. हा चित्रपट 12 जुलैपासून नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo