OTT: Amazon Mini TV वर सबस्क्रिप्शनशिवाय बघा ‘या’ 5 सर्वोत्कृष्ट सिरीज, मिळेल भरपूर मनोरंजन

Updated on 18-Jul-2022
HIGHLIGHTS

Amazon Mini TV वर सबस्क्रिप्शनशिवाय बघा वेब सिरीज

फ्रीमध्ये बघा 'या' 5 सर्वोत्कृष्ट सिरीज

'उलझे हुए' सीरिजला IMDB कडून 8.3 रेटिंग

आजकाल OTT प्लॅटफॉर्म मनोरंजनासाठी प्रेक्षकांची पहिली पसंती बनली आहे. OTT वर, लोकांना त्यांच्या आवडीच्या वेब सिरीज किंवा चित्रपट सहज पाहता येतात. मात्र, यासाठी तुम्हाला सब्स्क्रिप्शन घ्यावे लागते. परंतु तुम्हाला उत्तम कंटेंट हवे असेल आणि सदस्यत्व नसेल, तर तुम्ही Amazon Mini TV वर उत्तम सामग्री विनामूल्य पाहू शकता. येथे तुम्हाला प्रत्येक जॉनरचे चित्रपट आणि मिनी वेब सिरीज मोफत पाहायला मिळतील. 

हे सुद्धा वाचा : भारीच की ! फक्त चेहरा दाखवून Aadhar कार्ड डाउनलोड करा, 'अशा'प्रकारे वापरा FaceRD ऍप

अरेंज्ड

या सिरीजमध्ये तुम्हाला 'आश्रम' फेम त्रिधा चौधरी आणि ऋत्विक धनजानी यांची अप्रतिम केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. लग्नासाठी दोघांचे कुटुंबीय कसे भेटतात आणि नात्याची चर्चा कशी रंगात येते, हे दाखवण्यात आले आहे.

उलझे हुए

या सिरीजमध्ये अभिनेत्री संजना सांघी आणि अभिनेता अभय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. ही कथा रसिका आणि वरुणची आहे. रसिका एक इंट्रोव्हर्ट मुलगी आहे, तर वरुण एक वकील आहे. दोघे चित्रपटगृहाबाहेर भेटतात आणि नंतर ऑनलाइन डेटिंगद्वारे पुन्हा एकत्र येतात. या सीरिजला IMDB कडून 8.3 रेटिंग मिळाले आहे. 

उडन पटौला

एका छोट्या शहरातून आलेल्या आणि मोठ्या शहरात सेटल होण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार मुलींची ही कहाणी  आहे. प्रेमाच्या बाबतीत प्रत्येकजण कदाचित दुर्दैवी आहे, परंतु त्यांची मैत्री खूप छान आणि कमाल असते.

इश्क एक्सप्रेस

ही आरव आणि तान्याची प्रेमकहाणी आहे, घरी जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढताना त्या दोघांची भेट होते. ही दोघांची एक खूप सुंदर प्रेमकहाणी आहे. लोकांना ही मिनी वेब सिरीज खूप आवडली आहे. या सिरीजला Imdb कडून 8.1 रेटिंग मिळाले आहे.

बडबोली भावना

यात एका विवाहित जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये पत्नी ही कंटेंट क्रिएटर आहे. अंकुश बहुगुणा आणि अपूर्वा अरोरा या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. भावना आणि संकल्पाने भरलेल्या या कथेशी सध्याचे कपल्स स्वतःशी रिलेट करू शकतात.

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :