वर्षातील सर्वात मोठा क्रिकेट उत्सव इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL ची धमाकेदार सुरुवात होणार आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा उत्सव खूप महत्त्वाचा असतो. IPL क्रिकेट स्पर्धा शुक्रवार 22 मार्चपासून सुरू होणार आहे. जर तुम्ही IPL प्रेमी असाल तर तुमच्यासाठी या स्पर्धेशी संबंधित सर्व माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात IPL मॅचेस लाईव्ह कुठे आणि कसे बघायचे? वाचा सविस्तर-
हे सुद्धा वाचा: Lava O2 ची भारतीय लाँच डेट Confirm! देशी कंपनीचा Affordable फोन ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल। Tech News
जर तुम्हाला IPL 2024 घरबसल्या पाहायचे असेल तर, ते TV वरील स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर प्रसारित केले जाणार आहे. जर तुम्ही घराबाहेर असाल आणि तुमच्या स्मार्टफोनवर मॅच बघायची असेल, तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंगही ऑनलाइन केले जाणार आहे. JioCinema वर IPL ऑनलाइन स्ट्रीम होत आहे. विशेष बाब म्हणजे सामना LIVE पाहण्यासाठी तुम्हाला JioCinema चे सबस्क्रिप्शन घेण्याचीही गरज नाही. तुम्हाला तुमच्या फोनवर सामना अगदी मोफत पाहता येईल.
IPL चा पहिला सामना 22 मार्चला होणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. विशेष म्हणजे हा सामना रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. तुम्हाला हा समान वर सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये देखील पाहता येईल.