बिग बॉस हा भारताचा खूप पॉप्युलर रियालिटी शो आहे. सध्या या TVवर कलर्स हिंदी वाहिनीवर या शोचा 16 वा सिझन सुरु आहे. TV वर शोचा आनंद घेता येत नसेल, तर हा शो OTT प्लॅटफॉर्म VOOTवर देखील उपलब्ध आहे. एवढेच नाही, तर बिग बॉसची क्रेझ बघता मागील काही सिझनपासून VOOT वर या शोचे 24 तास प्रक्षेपण देखील केले जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला देखील या शोचे किंवा कलर्स वाहिनीवरील इतर मालिकांचे इ. चा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला या ऍपचे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागेल.
हे सुद्धा वाचा : Redmi चा जगातील सुपरफास्ट चार्जिंग फोन ! अवघ्या 9 मिनिटात होणार फुल चार्ज, मिळेल 200MP कॅमेरा
वूट सिलेक्ट ही सबस्क्रिप्शन सेवा आहे, जी वापरकर्त्यांना विविध भाषांमधील विविध सामग्री द्विगुणितपणे पाहण्याची परवानगी देते. Voot सिलेक्ट ही Voot ची सशुल्क आवृत्ती आहे, ज्यामध्ये तुम्हाला शो, चित्रपट आणि बरेच काही मिळते.
मोबाईल Voot सब्स्क्रिप्शन प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. हा प्लॅन एका वर्षाच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये चित्रपट, रियालिटी शो, टीव्ही चॅनेल आणि लाईव्ह गेम्सचा ऍक्सेस मिळेल. तुम्ही जाहिरातमुक्त कंटेंट पाहण्यास सक्षम असाल. मात्र हा प्लॅन फक्त मोबाईल सब्स्क्रिप्शन प्लॅन आहे, हे लक्षात घ्या.
वुटचा हा सब्स्क्रिप्शन प्लॅनदेखील वर्षभराच्या वैधतेसह येतो. या प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला चित्रपट, ओरिजिनल शो, टीव्ही चॅनेल आणि थेट लाईव्ह गेम्समध्ये ऍक्सेस मिळेल. तुम्ही एकावेळी 2 स्क्रीनवर पाहू शकता. जाहिरातींचा यामध्ये समावेश आहे. या प्लॅनसह तुम्ही टीव्हीवरही VOOT शोजचा आनंद घेऊ शकता.
वुटचा हा सब्स्क्रिप्शन प्लॅनदेखील वर्षभराच्या वैधतेसह येतो. या प्लॅनची किंमत 599 रुपये आहे. यामध्ये देखील चित्रपट, ओरीजनल्स शो, टीव्ही चॅनेल आणि लाईव्ह गेम्सचा ऍक्सेस मिळेल. तुम्ही एका वेळी 4 स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्हाला जाहिरातमुक्त कंटेंट बघायला मिळेल. तुम्ही टीव्हीवरही कंटेंटचा आनंद घेऊ शकता.