वोडाफोन ग्राहकांना दिवाळीत मिळणार 100MB डेटा मोफत

Updated on 05-Nov-2015
HIGHLIGHTS

ह्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ‘DIWALI लिहून 199वर मॅसेज पाठवावा लागेल. त्यानंतर आपण दिवाळीत ई-ग्रीटिंग, वेब ब्राउजिंग करु शकता.

मोबाईल ऑपरेटर कंपनी वोडाफोन ह्या दिवाळीत आपल्या ग्राहकांसाठी 100MB डेटा मोफत देणार आहे. खरे पाहता, कंपनीने एक नवीन ऑफर आणली आहे, ज्या अंतर्गत दिवाळीत आपल्या ग्राहकांसाठी 100MB डेटा मोफत देईल.

 

ह्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ‘DIWALI’  लिहून 199वर मॅसेज पाठवावा लागेल. त्यानंतर आपण दिवाळीत ई-ग्रीटिंग, वेब ब्राउजिंग करु शकता. त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांना आणि मित्ररिवाराला ऑनलाइन दिवाळी मेसेजपण पाठवू शकता.

वोडाफोन दिवाळी धमाकामध्ये कंपनीने 188 मिलियन ग्राहकांना दिवाळीत इंटरनेटसाठी 100MB डेटा दिला जाईल. हा डेटा संपूर्णपणे मोफत असेल. ही ऑफर बुधवारी ११ नोव्हेंबरपासून वोडाफोनच्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.

वोडाफोनने हल्लीच ग्राहकांसाठी वोडाफोन डबल्स ऑफर आणली होती, ज्यात ग्राहक दुप्पट डेटा आणि दुप्पट वैधता पॅक चा आनंद घेऊ शकतो.

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :