वोडाफोन १८०० मेगाहर्ट्ज बँडमध्ये 4G सेवा सुरु करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे आणि आपल्या काही ग्राहकांसाठी 4G सिमची होम डिलिवरी करण्याचेही कंपनीने व्यवस्था केली आहे.
मोबाईल ऑपरेटर कंपनी वोडाफोन दिल्ली आणि मुंबईमध्ये आपली 4G सेवा मार्च २०१६ मध्ये सुरु करेल. वोडाफोनने स्वत: ह्याविषयी माहिती दिली आहे. वोडाफोननुसार, मार्च २०१६ पर्यंत दिल्ली आणि मुंबईसह कोलकता आणि बंगळूरुमध्ये 4G सेवा सुरु केली जाईल. देशातील दुसरी सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर कंपनी वोडाफोनने डिसेंबरमध्ये 4G सेवा क्षेत्रात उतरणार असल्याची घोषणा केली होती.
ह्या संबंधी वोडाफोन इंडियाचे बिझनेस हेड इश्मित सिंहने अशी माहिती दिली आहे की, “आम्हाला असे वाटते की ग्राहक 4G सेवेसाठी पुर्णपणे तयार झाले पाहिजे, जेणेकरुन 4G सेवा लाँच व्हायच्या वेळी ग्राहकांना हाय स्पीड इंटरनेटचा अगदी सहजपणे आनंद घेता येईल. त्यासाठी आम्ही मुंबईपासून 4G रेडी सिमचे वितरण सुरु केले आहे.”
ते असेही म्हणाले की, वोडाफोन १८०० मेगाहर्ट्ज बँडमध्ये 4G सेवा सुरु करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे आणि आपल्या काही ग्राहकांसाठी 4G सिमची होम डिलिवरी करण्याची सुद्धा कंपनीने व्यवस्था केली आहे.
२७ डिसेंबरला रिलायन्सने आपली 4G मोबाईस सेवा रिलायन्स जियो सादर केली होती जी सध्यातरी रिलायन्स कर्मचा-यांसाठी उपलब्ध आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, रिलायनेस जियो 10 पटीच्या वेगाने डाउनलोड आणि 4 पटीच्या गतीने अपलोड करण्यास सक्षम असेल.