144Hz रिफ्रेश रेटसह Vivo Pad 2 लाँच, जाणून घ्या किंमत

Updated on 22-Apr-2023
HIGHLIGHTS

Vivo ने आपला टॅबलेट Vivo Pad 2 लाँच केला.

GB RAM सह 128 GB स्टोरेजची किंमत 2,499 चीनी युआन

यामध्ये 44W फास्ट चार्जिंगसह 10,000mAh बॅटरी आहे.

Vivo ने आपला टॅबलेट Vivo Pad 2 लाँच केला आहे. Vivo Pad 2 दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Vivo Pad 2 मध्ये MediaTek Dimensity 9000 प्रोसेसर असून 144Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. चला तर मग नवीन टॅब्लेटची किंमत आणि संपूर्ण फीचर्स जाणून घेऊयात – 

Vivo Pad 2 ची किंमत

Vivo Pad 2 च्या 8 GB RAM सह 128 GB स्टोरेजची किंमत 2,499 चीनी युआन म्हणजे अंदाजे 29,800 रुपये आहे. तर, 12GB रॅमसह 512GB वेरिएंटची किंमत 3,399 युआन म्हणजे अंदाजे 40,600 रुपये आहे. हा टॅब क्लियर सी ब्लू, फार वे माउंटन ग्रे आणि नेबुला पर्पल या कलर ऑप्शनमध्ये मिळेल. टॅबलेट भारतातील लाँचबद्दल फार माहिती मिळालेली नाही. 

Vivo Pad 2

Vivo Pad 2 मध्ये 12.1-इंच लांबीची 2.8K रिझोल्यूशन स्क्रीन आहे, डिस्प्लेचा रिफ्रेश दर 144Hz आहे. तसेच, Android 13 आधारित OriginOS 13 आहे. प्रोसेसर म्हणून टॅबमध्ये MediaTek Dimensity 9000 मिळेल. त्याबरोबरच, टॅबमध्ये ग्राफिक्ससाठी Mali-G710 10 कोर GPU आहे, 12 GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 512 GB पर्यंत स्टोरेज आहे.
 
याव्यतिरिक्त, यामध्ये 44W फास्ट चार्जिंगसह 10,000mAh बॅटरी आहे. तसेच, 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्स आहे. समोर 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, टॅबमध्ये ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2 आणि यूएसबी टाइप-C पोर्ट आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :