Vikram Vedha Teaser Out: ‘विक्रम वेधा’च्या टीझरमध्ये सैफ-हृतिकचा जलवा, बघा व्हिडिओ

Vikram Vedha Teaser Out: ‘विक्रम वेधा’च्या टीझरमध्ये सैफ-हृतिकचा जलवा, बघा व्हिडिओ
HIGHLIGHTS

'विक्रम वेधा' चित्रपटाचा टिझर आऊट

हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या जोडीने केली कमाल

टीजर बघितल्यावर चाहत्यांना चित्रपटाची प्रतीक्षा

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान स्टारर 'विक्रम वेधा' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हृतिक आणि सैफचा फर्स्ट लूक आल्यापासून, 2017 तमिळ चित्रपट विक्रम वेधाच्या अधिकृत हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान आर माधवन आणि विजय सेतुपती यांच्या जागी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हृतिक आणि सैफला जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ लक्षात घेऊन निर्मात्यांनी आज म्हणजेच बुधवारी त्याचा टीझर रिलीज केला आहे.

हे सुद्धा वाचा : iPhone 14 लाँच होण्यापूर्वी iPhone 13 Pro मॉडेल झाला 30 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या अप्रतिम ऑफर

एक मिनिट 46 सेकंदाच्या या टीझरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. एकंदरीत विक्रम वेधचा टीझर हा मनोरंजनाचे संपूर्ण पॅकेज आहे. खलनायकाच्या भूमिकेत हृतिक रोशन आणि पोलिस म्हणून सैफ अली खान यांची जोडी अप्रतिम दिसत आहेत. या दोघांना मोठ्या पडद्यावर पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

'विक्रम वेधा'चा टीझर सोशल मीडियावरही ट्रेंड करू लागला आहे. एका यूजरने लिहिले की, "ओरिजिनल फिल्मपेक्षा चांगला वाटला, थिएटर में आग लगी भाई तर एका चाहत्याने ट्विट केले, 'ऋतिक + ऍक्शन = ब्लॉकबस्टर. तो रिमेक असो वा ओरीजनल काही फरक पडत नाही, त्याचा टीझर धमाका आहे."

 ब्लॉकबस्टर 'वॉर' चित्रपटानंतर तीन वर्षानंतर हृतिक रोशन 'विक्रम वेध'सोबत मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हृतिक आणि सैफ पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. विक्रम वेधनंतर हृतिक 'फायटर' या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, विक्रम वेधा 30 सप्टेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo