खुशखबर ! VI युजर्ससाठी ‘या’ स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क उपलब्ध होणार

खुशखबर ! VI युजर्ससाठी ‘या’ स्मार्टफोनमध्ये 5G नेटवर्क उपलब्ध होणार
HIGHLIGHTS

Vodafone Idea ची भारतात 5G चाचणीसाठी Motorola सोबत भागीदारी

Vi ने अद्याप 5G सेवेच्या रोलआउटचे तपशील लोकांसाठी उघड केलेले नाहीत.

Vi 5G साठी तयार असलेल्या Motorola फोन्सची यादी बघा

Vodafone Idea ने भारतात 5G चाचणीसाठी Motorola सोबत भागीदारी केली आहे. Vi ने सांगितले की, Motorola ने दिल्लीतील त्यांच्या 'लोकप्रिय स्मार्टफोन मॉडेल'वर 3350 ते 3400 MHz 5G बँडची चाचणी केली आहे. मोटोरोलाने भारतात स्पेक्ट्रम लिलावापूर्वीच आपल्या मिड-रेंज आणि प्रीमियम फोनमध्ये 5G बँड जोडले आहेत. Vi ने अद्याप 5G सेवेच्या रोलआउटचे तपशील लोकांसाठी उघड केलेले नाहीत. 

हे सुद्धा वाचा : OnePlus 11 आज भारतात होईल लाँच, iQoo 11 शी होणार जबरदस्त स्पर्धा…

या भागीदारीचा अर्थ असा आहे की, जेव्हा Vodafone Idea भारतात वेगवान-इंटरनेट सेवा आणण्याचा निर्णय घेणार, तेव्हा Motorola फोन Vi 5G साठी तयार असतील. ज्या स्मार्टफोनमध्ये Vi 5G सपोर्ट असणार आहे, त्याची यादी खालीलप्रमाणे आहे… 

 Motorola Edge 30 Ultra, Motorola Edge 30 Fusion, Moto G62 5G, Motorola Edge 30, Moto G82 5G, Motorola Edge 30 Pro, Moto G71 5G, Moto G51 5G, Motorola Edge 20, Motorola Edge 20 Pro, Motorola Edge 20 फ्यूजन.

एका प्रेस रिलीजमध्ये Vi CMO अवनीश खोसला म्हणाले, "आमच्या 5G रोलआउटच्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून Motorola सोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की, भागीदारी 5G डिव्हाइस इकोसिस्टम विकसित करण्यात मदत करेल." Vi ने त्यांची 5G सेवा किती कालावधीत सुरू केली जाईल, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo