digit zero1 awards

स्मार्ट पार्टनरसाठी गिफ्ट हवंय ? ‘या’ 5 गॅजेट्ससह तुमचा Valentines Day बनवा स्पेशल

स्मार्ट पार्टनरसाठी गिफ्ट हवंय ? ‘या’ 5 गॅजेट्ससह तुमचा Valentines Day बनवा स्पेशल
HIGHLIGHTS

Valentines Day 2023 बनवा स्पेशल

तुमच्या स्मार्ट पार्टनरसाठी स्मार्ट गॅजेट्सची यादी

स्मार्टवॉच, फिटनेस ट्रॅकरसह बरेच गिफ्ट ऑप्शन्स

व्हॅलेंटाईन डे हा जोडप्यांसाठी खास दिवस असतो. व्हॅलेंटाईन डे अविस्मरणीय बनवण्यासाठी जोडप्यांना एकमेकांना भेटवस्तू द्यायला आवडतात. 2023 च्या व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना काही खास गॅजेट्स गिफ्ट करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही गिफ्ट आयडिया देणार आहोत…  

हे सुद्धा वाचा : OnePlus 11 vs OnePlus 11R: या फोनला सर्वात खास बनवणारी टॉप 5 फीचर्स पहा

Fitness trackers

 आरोग्य ही एक अशी गोष्ट आहे ज्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे, जर तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या आरोग्याचा खूप विचार करत असाल, तर या व्हॅलेंटाईन डे 2023 ला तुम्ही फिटनेस ट्रॅकर खरेदी करू शकता आणि भेट देऊ शकता. 

Headphones किंवा Buds

जर एखाद्या खास व्यक्तीला संगीत ऐकायला आवडत असेल, तर तुम्ही हेडफोन किंवा इअरबड्स देखील गिफ्ट करू शकता जे उत्तम आवाजाच्या गुणवत्तेसह येतात. परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये, तुम्हाला Dizo, Noise, Boat  सारख्या ब्रँडचे पर्याय मिळतील. 

Smartwatches

 या व्हॅलेंटाईन वीक किंवा व्हॅलेंटाईन डे 2023 च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या स्मार्ट पार्टनरला नवीन स्मार्टवॉच देखील भेट देऊ शकता. परवडणाऱ्यापासून प्रीमियमपर्यंत प्रत्येक श्रेणीत तुम्हाला स्मार्ट वॉचेस मिळतील.

Speakers

जर तुमच्या जोडीदाराला घरात संगीत ऐकायला किंवा चित्रपट बघायला आवडत असेल तर त्यांच्यासाठी स्मार्ट स्पीकर हा एक उत्तम गिफ्ट पर्यायही ठरू शकतो. तुम्हाला कमी किमतीपासून ते प्रीमियम सेगमेंटपर्यंतचे स्मार्ट स्पीकर देखील मिळतील, नवीन स्पीकर घेताना तुम्ही JBL, Sony, BOSE यासह इतर ब्रँडचे मॉडेल पाहू शकता.

Mobiles

मोबाईल म्हणा किंवा स्मार्टफोन ते तुमच्या जोडीदाराला गिफ्ट करू शकता. तुम्ही या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने लेटेस्ट स्मार्टफोनही भेट देऊ शकता. Flipkart आणि Amazon वर, तुम्ही डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन स्वस्तात महागडे फोन खरेदी करू शकाल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo