आता फेसबुकवर मिळणार बातम्या आणि हवामानाच्या सूचना
आता फेसबुक अलर्टमध्ये कम्युनिटी बातम्या आणि कार्यक्रम, वादळाचा इशारा आणि हवामानाशी संबंधित असलेली सर्व माहिती यांचा समावेश असेल. तसेच टीव्हीवरील कार्यक्रम आणि चित्रपट याविषयीसुद्धा सूचना दिल्या आहेत.
सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने येणा-या दिवसात आपल्या यूजर्सला वैयक्तिक माहिती देणार आहे. कंपनीने सोमवारी अशी माहिती दिली आहे की, आता यूजरला स्पोर्ट्सचे स्कोअर, हवामान आणि स्थानिक बातम्यांचे अपडेट दिले जाईल. फेसबुक अॅप वापणा-या यूजरला आतापर्यंत मित्रांचे पोस्ट, वाढदिवस आणि येेणा-या कार्यक्रमांविषयी नोटीफिकेशन मिळत होते.
त्याचबरोबर ह्या अलर्टमध्ये कम्युनिटी बातम्या आणि कार्यक्रम, वादळाचा इशारा आणि हवामानाशी संबंधित असलेली सर्व माहिती यांचा समावेश असेल. तसेच टीव्हीवरील कार्यक्रम आणि चित्रपट याविषयीसुद्धा सूचना दिल्या आहेत. ह्याविषयी फेसबुकचे प्रोडक्ट मॅनेजर कीथ पीयरिसने सांगितले की, “आम्हाला असे अभिप्राय मिळाले होते की यूजर्संना जास्तीत जास्त माहिती हवी होती आणि सर्व एकाच ठिकाणी हवी होती.”
त्याचबरोबर ते असेही म्हणाले की, यूजर ह्या मेसेजला आपल्या सुविधा आणि इच्छेनुसार वैयक्तिक करु शकता. फेसबुकने सांगितले की, ह्या नवीन वैशिष्ट्याला हळूहळू अॅनड्रॉइड आणि IOS डिवाइसवर रिलीज केले जाईल.
ह्या नवीन नोटिफिकेशन फिचर यूजरला स्वत:हून सेटिंग्समध्ये जाऊन सक्रिय करावे लागेल.
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile