आधी वनप्लस कंपनीने £3.99 (404 रुपये) यात नवीन USB टाइप-C अॅडॅप्टर लाँच केला होता. इतक्या कमी किंमतीत USB टाइप-C अॅडॅप्टर बरीच चांगली डिल होऊ शकला असता, मात्र आता ह्याच्या कामगिरीबद्दल प्रश्न उपस्थित होतायत.
गुगलचे एक इंजिनियर बेनसन लेउंग(Benson Leung) नुसार वनप्लस टाइप-C कनेक्टिंग अॅडॅप्टर स्टँडर्ड तपशीलाप्रमाणे काम करत नाही. त्यांनी अशी माहिती दिली आहे की, वनप्लसचा अॅडॅप्टर व्यवस्थित काम करत नाही आणि हा वापरल्यावर आपला डिवाईस खराब होऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी वनप्लस कंपनीने £3.99 (402 रुपये) यात नवीन USB टाइप-C अॅडॅप्टर लाँच केला होता. इतक्या कमी किंमतीत USB टाइप-C अॅडॅप्टर बरीच चांगली डिल होऊ शकला असता, मात्र आता ह्याच्या कामगिरीबद्दल प्रश्न उपस्थित होतायत.
गुगलचे इंजिनियर बेनसन लेउंग आपल्या पोस्टमधून अशी माहिती दिली आहे की, “ह्या नवीन USB टाइप-C अॅडॅप्टरला आपल्या क्रोमबुक पिक्सेल किंवा नेक्सास 6P/5X साठी खरेदी करु नका. हा चुकीचा रेसिस्टर वापरतो.”
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे सांगितले की, USB टाइप-C 1.1 स्पेसिफिकेशन डिवाईसमध्ये 3A पॉवरचा वापर होतो. ही पॉवर नेक्सास 5X, नेक्सास 6P सारख्या डिवाइससाठी आहे. वनप्लससाठी USB टाइप-C अॅडॅप्टरसह अशी समस्या आहे की, हा 3A पॉवरचा पुरवठा पुर्ण करु शकत नाही. अशातच डिवाईस अन्य सोर्सद्वारे सप्लाय घेईल.. त्यामुळे डिवाईसला नुकसान पोहोचू शकते. तथापि, ह्यासंबंधी वनप्लसने सांगितले आहे की, त्यांचा USB टाइप-C अॅडॅप्टर योग्यरित्या काम करतो आणि ग्राहकांनी कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे.