UPI New Rules 2024: RBI ने नवीन वर्षात जारी केले नवे नियम, UPI ची सुरक्षा आता एक पाऊल पुढे। Tech News
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने काही नवीन नियम लागू केले.
हे नवे नियम 1 जानेवारी 2024 पासून लागू झाले आहेत.
नवे 5 महत्वाचे नियम जे UPI वापरकर्त्यांना माहित असणे आवश्यक आहे.
आजच्या डिजिटल युगात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस किंवा UPI आजकाल सर्वात लोकप्रिय पेमेंट मोड्सपैकी एक आहे. ही झटपट रीअल-टाइम पेमेंट सिस्टम ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (NPCI) ने विकसित केली आहे. ज्याच्या मदतीने वापरकर्ते एकाच मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये अनेक बँक अकाउंट्स वापरू शकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो की, 2016 मध्ये अधिकृतपणे सार्वजनिक वापरासाठी लाँच केलेल्या UPI मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बदल झाले आहेत. दरम्यान, हे प्लॅटफॉर्म आणखी सुरक्षित करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने काही नवीन नियम लागू केले आहेत, जे 1 जानेवारी 2024 पासून लागू झाले आहेत. येथे 5 महत्वाचे नियम आहेत जे UPI वापरकर्त्यांना माहित असणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा: JIO च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतो मोफत इंटरनेट कॉल ऑप्शन, एका नंबरसह 3 नंबर मिळतील Free। Tech News
Inactive UPI IDs
NPCI ने बँक आणि Google Pay, Paytm आणि PhonePe सारख्या ऑनलाइन पेमेंट Apps ना असे UPI आयडी निष्क्रिय करण्याचे निर्देश दिले आहेत, जे जवळपास एका वर्षापासून सक्रिय नाहीत.
UPI For Secondary Market
नव्या नियमांमध्ये काही नव्या घोषणा देखील करण्यात आल्या आहेत, NPCI ने ‘ UPI For Secondary Market’ ची घोषणा केली आहे, जी सध्या बीटा फेसमध्ये दाखल झाली आहे. हे App मर्यादित पायलट ग्राहकांना ट्रेड कन्फर्मेशननंतर फंड ब्लॉक करण्याची आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशनद्वारे T1 आधारावर पेमेंट सेटल करण्याची परवानगी देते.
Transaction limit
केंद्रीय बँकेने UPI पेमेंटसाठी व्यवहार मर्यादा लक्षणीयरीत्या वाढवली आहे. डिसेंबरमध्ये RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पुन्हा एकदा मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती. ही मर्यादा आता 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये झाली आहे.
लक्षात घ्या की, ही मर्यादा रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्थांच्या पेमेंटसाठी लागू असेल. लोकांना अशा व्यवहारांसाठी UPI स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Cash Withdrawal Via QR Code
NPCI आणि Hitachi पेमेंट सर्व्हिसेसने भारतातील पहिले UPI-ATM लाँच करण्यासाठी पार्टनरशिप केली आहे. यासह वापरकर्ते QR कोड स्कॅन करून सहजपणे पैसे काढू शकतील. RBI देशभरात UPI ATM सुरू करणार आहे, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
4-hour window
UPI व्यवहारांची सुरक्षा आणखी एक पाऊल पुढे करण्यासाठी RBI ने नवीन प्राप्तकर्त्यांना 2000 रुपयांवरील पहिले पेमेंट करणार्या वापरकर्त्यांसाठी चार तासांची वेळ मर्यादा सेट केली आहे. यासह, App मध्ये नियंत्रण आणि सुरक्षिततेचा आणखी एक स्तर जोडला गेला आहे. कारण युजर्सना या कालावधीदरम्यान व्यवहारांमध्ये बदल करण्यास अनुमती मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile