UPI Lite X Feature: आता नेटवर्कशिवाय पाठवता येतील ऑनलाईन पैसे, ‘अशा’प्रकारे करेल काम

Updated on 11-Sep-2023
HIGHLIGHTS

RBI ने नुकतेच नवीन UPI ​​Lite X फीचर लाँच केले आहे.

या फीचरमुळे युजर्स आता नेटवर्कशिवाय पैसे ट्रान्सफर करू शकतात.

जर तुमच्या फोनमध्ये रिचार्ज किंवा इंटरनेट डेटा नसेल तरीही पेमेंट करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणाली भारतात खूप लोकप्रिय आहे. मात्र ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होते. देशात बऱ्याच भागात अजूनही नेटवर्कची समस्या आहे, हे आपल्याला माहिती आहे. अशात इंटरनेट कनेक्टिव्हिटी UPI पेमेंटच्या मार्गात अडथळा ठरत होती. ही समस्या दूर करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने नुकतेच नवीन UPI ​​Lite X फीचर लाँच केले आहे. या फीचरमुळे युजर्स आता नेटवर्कशिवाय पैसे ट्रान्सफर करू शकतात. 

UPI Lite X

वर सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही नेटवर्क नसलेल्या भागात असाल तरीही UPI Lite X वापरकर्त्यांना कनेक्टिव्हिटी नसलेल्या भागात व्यवहार करण्याची परवानगी देते. ज्या भागात नेटवर्क समस्या आहेत, त्यांच्यासाठी हे फिचर उपयुक्त आहे. तसेच, जर तुमच्या फोनमध्ये रिचार्ज किंवा इंटरनेट डेटा नसेल तरीही पेमेंट करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. 

UPI बँक खात्यातून एका दिवसात जास्तीत जास्त 2 लाख रुपये ट्रान्सफर केले जाऊ शकतात. UPI Lite ची कमाल मर्यादा 500 रुपये आहे. एका दिवसात पैसे पाठवण्याची कमाल मर्यादा 4,000 रुपये आहे. पण UPI Lite X साठी अशी कोणतीही मर्यादा सेट करण्यात आलेली नाही. 

'अशा'प्रकारे करेल काम

– वापरकर्त्यांचा UPI ID किंवा लिंक केलेला फोन नंबर वापरून QR कोड स्कॅन करून हे व्यवहार पूर्ण केले जाऊ शकतात.
 
– UPI Lite X व्यवहारांसाठी, वापरकर्त्यांना एकमेकांच्या उपकरणांच्या जवळ असणे आवश्यक आहे.

 – UPI व्यवहारादरम्यान पैसे एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित हस्तांतरित केले जातात. 

– पैसे UPI Lite वरून ऑन-डिव्हाइस वॉलेट किंवा UPI Lite खात्यावर पाठवले जातात.

UPI आणि UPI Lite मधील अंतर

UPI Lite हे पेमेंट सोल्यूशन आहे, जे छोट्या व्यवहारांसाठी काम करते. यामध्ये 500 रुपयांपेक्षा कमी पैसे भरता येतील. हे फिचर 'ऑन-डिव्हाइस वॉलेट' सारखे आहे, जे वापरकर्त्यांना UPI पिन वापरून पेमेंट करू देते. त्याबरोबरच, वर सांगितल्याप्रमाणे UPI बँक खात्यातून एका दिवसात जास्तीत जास्त 2 लाख रुपये ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :