आजकाल जवळपास प्रत्येक जण ऑनलाईन पेमेंट ऑप्शनचा वापर करतो. मात्र, यासह फसवणुकीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. दरम्यान, तुम्हाला अनेकद पेमेंट करताना ऑटोपेचा पर्याय मिळतो. यासह UPI द्वारे पेमेंट करताना तुम्हाला खूप सावध राहावे लागेल.
Also Read: Jio New Plans: भारी बेनिफिट्ससह कंपनीने लाँच केले अनेक नवीन प्लॅन्स, ‘या’ युजर्सची तर मज्जाच मजा!
या रिपोर्टमध्ये, आम्ही तुम्हाला ‘Autopay स्कॅम’ बद्दल माहिती देणार आहोत. अनेकदा असे घडते की, ऑटो पे ऑन केल्यानंतर आपण विसरतो किंवा आपल्याला लक्षात राहत नाही. अशा परिस्थितीत, तुम्हाला खूप सुरक्षित राहण्याची गरज आहे. पाहुयात यासह स्कॅम कसा होऊ शकतो आणि ते टाळण्यासाठी काय करावे:
स्कॅमर्स आजकाल सध्या लिंक पाठवतात आणि पैसे मागतात. अशा परिस्थितीत, काहीवेळा वापरकर्ते पेमेंट करतात, परंतु ते पेमेंट एकदाच होत नाही. या पेमेंटसह ऑटो पे ऑन होतो. ऑटो पे ऑन करणे म्हणजे पुढील पेमेंट तुमच्या बँक खात्यातून आपोआप कट केला जातो. म्हणजेच, यासाठी त्यांना पुन्हा UPI पिन घेण्याची गरज भासणार नाही आणि तो थेट पेमेंट खात्यातूनही कट होईल.
पेमेंट करण्यासाठी तुम्ही कोणतेही ॲप वापरता, तुम्ही त्याचा ऑटो पे मेनू पुन्हा पुन्हा तपासत राहिले पाहिजे. असे केल्याने तुम्हाला किमान हे कळेल की, तुम्ही कोणत्या ठिकाणी ऑटो पे सिस्टम सक्रिय केली की नाही? यामुळे तुम्ही ताबडतोब काळजी घेतली पाहिजे. तसेच, तुम्हाला कोणतीही ऑटो पे सिस्टम दिसली जी तुम्ही ऑन केली नाही, ती सेटिंग तुम्ही ताबडतोब बदलावी.
ऑटो पे रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला UPI पिन माहित असणे, आवश्यक आहे. ऑटो पे मेनूमध्ये लिस्टिंगसह तुम्हाला ते रिमूव्ह करण्याचा पर्याय दिला जातो. तुम्ही ऑटो पे हटवल्यास तुमच्या बँक खात्यातून पैसे कट होणार नाहीत. अशाने तुम्ही स्कॅम्सपासून सहज सुरक्षित राहू शकता.