Aadhaar Card वापरून PAN मध्ये पत्ता अपडेट करा, बघा अगदी सोपा मार्ग…
पॅन कार्ड हे भारत सरकारने जारी केलेल्या महत्त्वाच्या अधिकृत ओळख दस्तऐवजांपैकी एक
आधार कार्डद्वारे PAN मध्ये पत्ता अपडेट करा.
यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल.
परमनंट अकाउंट नंबर (PAN) हा भारतीय नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्र आहे. ही 10 अंकी संख्या आहे. पॅन कार्ड हे भारत सरकारने जारी केलेल्या महत्त्वाच्या अधिकृत ओळख दस्तऐवजांपैकी एक आहे. आयकर विभागाकडून नागरिकांना पॅन जारी केला जातो आणि अनेकदा अधिकृत प्रक्रियेदरम्यान वापरला जातो. या कारणास्तव, कागदपत्रांवर तुमचा योग्य तपशील अपडेट करणे आवश्यक आहे. आज आम्ही आधार कार्डद्वारे पॅनमध्ये पत्ता कसा बदलायचा हे सांगणार आहोत.
हे सुद्धा वाचा : Flipkart Big Saving Days सेलचा शेवटचा दिवस! फक्त रु. 18,999 मध्ये खरेदी करा iPhone 11
आधार कार्डद्वारे PAN मध्ये पत्ता अपडेट करा.
तुमच्या पॅन कार्डमध्ये चुकीचा किंवा जुना पत्ता लिहिला गेला असेल, तर तुमचा पत्ता अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच, तुमचा पॅन आणि आधार सारख्या कागदपत्रांचा पत्ता एकच असावा. या प्रकरणांमध्ये तुम्ही आधार वापरून तुमचा पॅन कार्ड पत्ता ऑनलाइन अपडेट करू शकता.
– सर्व प्रथम UTI इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी आणि सर्व्हिसेसच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
– आता खाली स्क्रोल करा आणि पॅन कार्ड सेवांवर क्लिक करा.
– यानंतर eKYC मोड पर्यायाद्वारे पॅन डेटाबेसमध्ये पत्ता अपडेट करण्यासाठी सुविधा वर क्लिक करा.
– आता विचारले जाणारे सर्व तपशील भरा. नंतर कॅप्चा कोड प्रविष्ट करा. टर्म आणि कंडिशन चॅट बॉक्सवर क्लिक करा.
– सबमिशन केल्यानंतर, OTP आधार लिंक केलेल्या नंबरवर किंवा ईमेल आयडीवर येईल.
– OTP एंटर करा आणि सबमिट बटणवर क्लिक करा.
संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या आधार तपशीलानुसार तुमचा पत्ता तुमच्या पॅनवर अपडेट केला जाईल. तुम्हाला पुष्टी करणारा इमेल आणि टेक्स्टसुद्धा मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile