Mirzapur Season 3 आणि Asur 2 सारख्या जबरदस्त सिरीज येत आहेत, पहा आगामी वेबसिरीजची यादी

Updated on 30-Aug-2022

सध्या प्रेक्षकांमध्ये वेब सिरीजबद्दल एक वेगळीच क्रेझ बघायला मिळतेय. येत्या काळात OTT बरेच वेब सिरीज आणि चित्रपट बघायला मिळणार आहेत. वेब सीरिज असो किंवा OTT वर प्रदर्शित होणारे चित्रपट, प्रेक्षकांसाठी हा मनोरंजनाचा डोस आहे. OTT प्लॅटफॉर्मवर हिट सिरीजचा दुसरा, तिसरा सीझन प्रदर्शित करण्यासाठी चित्रपट निर्मातेही सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. बघा आगामी वेब सिरीजची यादी… 

हे सुद्धा वाचा : भारीच की ! REDMI आणणार सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, मिळणार महागड्या फोनचे फीचर्स

Mirzapur Season 3

क्राइम थ्रिलर मिर्झापूरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, या हिट सिरीजचा सीझन 3 लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या त्याची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. गुड्डू भैया आणि कलेन भैयाला पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे. ही सिरीज OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर बघायला मिळणार आहे. 

Asur Season 2

अर्शद वारसी, बरुण सोबती, रिद्धी डोगरा, अनुप्रिया गोएंका, अमेय वाध यांसारख्या कलाकारांच्या भूमिका असलेल्या असुर या हिट सिरीजच्या दुसऱ्या सीझनची जवळपास सर्वच प्रेक्षक वाट पाहत आहेत.
हा सायकोथ्रिलर लवकरच टीव्हीच्या पडद्यावर दाखल होणार असल्याचे निर्मात्यांनी संकेत दिले आहेत. ही सिरीज Voot Select वर पाहता येईल. 

The Family Man 3

मनोज बाजपेयींच्या 'द फॅमिली मॅन' या हिट वेब सीरिजच्या तिसऱ्या सीजनची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. या सिरींजमधील श्रीकांत तिवारीची मनोज बाजपेयीची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.
आम्ही तुम्हाला सांगतो की लवकरच द फॅमिली मॅन 3 देखील प्रदर्शित होणार आहे. शक्यतो ही सिरीज नोव्हेंबर, 2022मध्ये Amazon Prime Video वर रिलीज होणार आहे. 

Fabulous Lives of Bollywood Wives सीजन 2

स्टार्सच्या पत्नींच्या वैयक्तिक आयुष्यावर आधारित फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलीवूडच्या सीझन 2 चा पहिला प्रोमो रिलीज करून या सिरीजच्या नवीन सीझनची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या या सिरीजचा हा दुसरा सीझन आहे. या सिरीजमध्ये भावना पांडे, गौरी खान आणि करण जोहरच्या चिटचॅटचे काही सीन्स समाविष्ट करण्यात आले आहेत. ही सिरीज 2 सप्टेंबर 2022 रोजी NETFLIXवर रिलीज होणार आहे. 

Jamtara 2

'जामताडा सबका नंबर आएगा' ही छोट्या शहरातील तरुण मित्रांची कथा आहे, जे फिशिंग रॅकेटमध्ये सामील आहेत. जामतारा झारखंडमधील घोटाळेबाजांवर आधारित होता, जे देशभरातील लोकांच्या बँक खात्यांमधून अनेक निधीची अपहार करतात. ही सिरीज 23 सप्टेंबर 2022 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

Guns And Gulaabs

'गन्स अँड गुलाब्स' ही आगामी नेटफ्लिक्स वेब सीरिज आहे, एक कॉमेडी क्राईम थ्रिलर आहे. या सिरीजद्वारे राजकुमार राव त्याच्या पहिल्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सिरीजमध्ये राजकुमार राव व्यतिरिक्त दुल्कर सलमान, आदर्श गौरव हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिरीजमध्ये राजकुमार राव 90 च्या दशकात दिसणार आहे. ही सिरीज 9 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :