केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीवरील सबसिडी आणखी 1 वर्षासाठी वाढवली जाईल, ज्यामुळे भारतात ईव्ही स्वस्त होतील. एफएम निर्मला सीतारामन म्हणाल्या, "बॅटरीसाठी लिथियम-आयन सेलवर सवलतीचे शुल्क आणखी एक वर्ष सुरू ठेवण्याचा माझा प्रस्ताव आहे." मे 2021 मध्ये, सरकारने बॅटरी प्रोडक्टसाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजना सुरू केली. सरकारने FAME योजनेतील निधीही दुप्पट केला आहे.
हे सुद्धा वाचा : Union Budget 2023: 5G ऍप्स आणि सेवांसाठी 100 लॅब तयार केले जातील
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसद भवनात अर्थसंकल्पीय भाषणाचे वाचन सुरू केले. अमृत काळातील हा पहिला अर्थसंकल्प असून मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवर GST कमी होईल पीएलआय योजनेचा उद्देश इलेक्ट्रिक वाहनांच्या या महत्त्वाच्या घटकाच्या किमती कमी करणे हा होता. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवरील वस्तू आणि सेवा कर (GST) 12% वरून 5% करण्यात आला.
तसेच, FM निर्मला सीतारामन म्हणाल्या, 5G सेवा वापरून ऍप्स बनवण्यासाठी 100 लॅब इंजिनीअरिंग संस्थांमध्ये स्थापन केले जातील. यामध्ये स्मार्ट क्लासरूम, प्रिसिजन फार्मिंग, इंटेलिजंट आणि लॅब्समधील ट्रान्सपोर्ट सिस्टीम यासारख्या ऍप्सचा समावेश असेल.