Aadhaar: आता आधार चे ऑफलाइन वेरिफिकेशन झाले सोप्पे, सरकार चे नवे पाऊल
आधार च्या बाबतीत UIDAI ने एक निर्णय घेतला आहे, या संस्थेने आता ऑफलाइन वेरिफिकेशन साठी पण नवीन QR Code सादर केला आहे. हा नवीन कोड एक फोटो सह येतो, ज्यामुळे ऑफलाइन वेरिफिकेशन अजूनच सोप्पे होईल.
आधार ला एक नवीन प्रकारची सुरक्षा लेयर देण्याच्या उद्देशाने UIDAI ने एक मोठे पाऊल टाकले आहे. UIDAI ने एक नवीन QR Code सादर केला आहे, जो कुछ काही महत्वपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, फोटो आणि जन्म तारखेवर नियंत्रण ठेऊ शकतो.
तसेच याचा वापर ऑफलाइन यूजर्स करू शकतात आणि आता तुम्हाला या Code व्यतिरिक्त कोणत्याही 12 डिजिट च्या ID नंबर ची पण गरज पडणार नाही. ही सेवा ऑफलाइन यूजर्सना जास्त लाभदायक ठरेल आणि आणि त्यांच्या सुरक्षेला पण वाढवेल.
तुम्हाला तर माहितीच आहे की मागच्या काही काळात आधार सर्वांसाठी एक महत्वपूर्ण दस्तावेज बनला आहे आणि सरकार ने याला सर्व ठिकाणी लागू केले आहे, याला आज एका राष्ट्रीय ID प्रूफ च्या रुपात बघितले जात आहे. याला एवढ महत्वपूर्ण बनवण्यात सरकारचा हात जास्त आहे.
हा नवीन QR Code एका फोटो सोबत येईल, जो ऑफलाइन मोड वर वापरता येऊ शकतो. यामुळे तुमच्या या दस्तावेजाची सुरक्षा अजूनच वाढेल.
आता तुम्ही UIDAI च्या वेबसाइट किंवा अॅप वरून आपल्या बायोमेट्रिक ID सोबत हा QR Code डाउनलोड आणि प्रिंट करू शकता. हा कोड तुम्हाला एका बारकोड रुपात मिळणार आहे, ज्यात फक्त मशीनला वाचता येईल अशी माहिती असेल.