देशभरात सध्या अनेक प्रकारचे स्कॅम घडत आहेत. या स्कॅम्सद्वारे अनेक नागरिकांची फसवणूक होऊन त्यांचे नुकसान होत असते. स्कॅमर्स अनेक पद्धतीने लोकांची फसवणूक करत असतात. सध्या देशातील सुप्रसिद्ध पेमेंट पद्धत म्हणून UPI वाढत असल्याने डिजिटल व्यवहारांशी संबंधित फसवणुकीची अनेक प्रकरणेही समोर येताना दिसत आहेत. ज्यांना टेक्नॉलॉजीची फारशी माहिती नाही ते बहुतेक लोक या स्कॅम्सना बडी पडत आहेत. UPI स्कॅम्सद्वारे अनेकांचे लाखोंचे नुकसान झाल्याच्या बातम्या आपण दररोज ऐकतो. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला UPI स्कॅमबद्दल माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्ही या स्कॅम्सपासून स्वतःचे बचाव करू शकता.
हे सुद्धा वाचा: How to: फोनवर सतत येणाऱ्या जाहिरातींमुळे तुम्ही सुद्धा वैतागलात? ‘अशा’ प्रकारे छोट्याशा सेटिंगद्वारे करा Ads ब्लॉक। Tech News
UPI फसवणूक ही कोणतीही संशयास्पद गतिविधी असेल, जी UPI व्यवहाराद्वारे होईल. UPI द्वारे मोबाईल फोनद्वारे कोणत्याही बँक खात्यात पैसे त्वरित ट्रान्सफर केले जाऊ शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, जरी UPI व्यवहार जलद आणि अधिक सुलभ होत असेल, तरीही याद्वारे ग्राहक कोणत्याही घोटाळ्यात सहज अडकू शकतात.
फेक बिल स्कॅम: सध्या चालू असलेला सर्वात प्रभावी UPI घोटाळा म्हणजे फेक बिल स्कॅम होय. या घोटाळ्यात सायबर गुन्हेगार सर्वसामान्यांना फोन करून त्यांची बिल सेटल करण्यास सांगतात. UPI द्वारे बिल सेटल करताना तुम्ही सहज त्यांच्या सापळ्यात अडकू शकता. त्यामुळे तुम्ही शक्य तितकी सावधगिरी बाळगली पाहिजे.
फेक कस्टमर सपोर्ट सुविधा: या स्कॅममध्ये सामान्य लोकांना मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा कस्टमर केअर म्हणून UPI रिक्वेस्ट पाठवल्या जातात. या स्कॅममध्ये ग्राहकांना तांत्रिक सहाय्य देण्यासाठी कॉल केला जातो. जर तुम्ही या जाळ्यात अडकलात तर तुमचा फोन सपोर्ट त्यांच्याकडे जातो, त्यानंतर ते तुमच्या खात्यापर्यंत देखील पोहोचतात आणि UPI द्वारे तुमचे मोठे आर्थिक नुकसान करतात.
UPI घोटाळ्यापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे काही महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे:
अशाप्रकारे, आपणच सतर्क राहिल्यास आपण आपले संरक्षण सहज करू शकता. त्याबरोबरच, इतरही लोकांना याबाबदल जागरूक राहण्यास सांग, जेणेकरून तुम्ही तसेच तुमचे जवळचे लोक UPI स्कॅमच्या जाळ्यात अडकणार नाही.