मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना ’मेक इन इंडिया’ साठी ट्विटर इमोजी लाँच केला आहे. बुधवारी लाँच केल्या गेलेल्या ह्या ट्विटर इमोजीमुळे ‘मेक इन इंडिया’ च्या संकल्पनेला अजून पुढे नेण्यासाठी मदत होईल. ‘मेक इन इंडिया’ चा उद्देश देशाला वैश्विक विनिर्माण केंद्राच्या रुपात वाढवणे हा आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारमण यांच्या सॅन फ्रान्सिस्कोच्या ट्विटरच्या मुख्यालयाच्या दौ-यानंतर एक विज्ञप्तिमध्ये ट्विटरने सांगितले की, “ह्या सरकारच्या अभियानाच्या एक प्रमुख आकर्षणाच्या रुपात नारंगी रंग असलेली पृष्टभूमिमध्ये काळ्या रंगाचा वाघरुपी इमोजी राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अधिकृत लोकांचे एक संस्करण केले होते.”
त्याचबरोबर केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डोर्से यांची भेट घेतली आणि रणनीतिक विकास बाजाराच्या रुपात भारताचे महत्व याविषयांबर चर्चा केली आणि देशाला जगामध्ये ह्या प्लेटफॉर्मच्या माध्यमातून कसे वाढवले जाईल, याविषयांवरही चर्चा केली.
हाती आलेल्या माहितीनुसार, “मेक इन इंडिया इमोजी ट्विटरवर ब्रँडच्या अभियानाच्या सफलतेचे प्रतीक आहे. उपयोगकर्ता भारताला प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीसाठी एक महत्वाचे स्थान म्हणून प्रसिद्धी देईल, जे देशाला एक वैश्विक विनिर्माण केंद्राच्या रुपात विकसित करेल.”