TRAI New Rule: बनावट लिंक असलेल्या मॅसेजवर बंदी! आजपासून नवा नियम लागू, वाचा सविस्तर 

TRAI New Rule: बनावट लिंक असलेल्या मॅसेजवर बंदी! आजपासून नवा नियम लागू, वाचा सविस्तर 
HIGHLIGHTS

आज म्हणजेच 1 ऑक्टोबर 2024 रोजी TRAI ने नवीन नियम लागू केला आहे.

आता स्पॅम वेब लिंक, URL आणि APK असलेले मॅसेजेस आपोआप ब्लॉक केले जातील.

सरकारने मंजूर न केलेल्या बँक आणि पेमेंट प्लॅटफॉर्मवरून OTP मॅसेजेस देखील येणार नाहीत.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने एक नवा नियम जरी केला आहे. वापरकर्त्यांचे हित लक्षात घेऊन आज म्हणजेच 1 ऑक्टोबर 2024 रोजी TRAI ने नवीन नियम लागू केला आहे. TRAI च्या नव्या नियमानुसार, आता स्पॅम वेब लिंक, URL आणि APK असलेले मॅसेजेस आपोआप ब्लॉक केले जातील. या नव्या नियमामुळे ऑनलाइन फसवणूक टाळता येईल आणि त्याबरोबरच, तुमची वैयक्तिक माहिती देखील सुरक्षित राहणार आहे.

Also Read: Price Cut! लेटेस्ट Oppo F27 5G फोनच्या किमतीत 2000 रुपयांची कपात, जाणून घ्या नवी किंमत

दरम्यान, तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा नियम 1 सप्टेंबरपासून देशभरात लागू होणार होता. परंतु टेलिकॉम कंपन्या आणि भागधारकांच्या विनंतीमुळे तो एक महिना पुढे वाढवण्यात आला. अखेर आज TRAI ने हा नवा नियम लागू केला आहे.

TRAI New Rule: बनावट लिंक असलेल्या मॅसेजवर बंदी!

TRAI ने जारी केला नवा नियम

नवीन नियमानुसार देशातील सर्व टेलिकॉम कंपन्यांना कठोर आदेश देण्यात आले आहेत की, आता त्यांना OTP आणि लिंक असलेले मेसेज पाठवण्यासाठी विशिष्ट टेम्प्लेट वापरावे लागेल. जर कंपन्यांनी याचे पालन केले नाही तर, त्यांचे मॅसेजेस त्वरित ब्लॉक केले जातील. TRAI ने विशेषतः फेक कॉल्स आणि मॅसेजेस थांबवण्यासाठी हा नवा नियम सादर केला आहे. लक्षात घ्या की, हा नियम लागू झाल्यानंतर नोंदणी नसलेल्या कंपन्यांकडून मॅसेजेस आणि कॉल्स येणार नाही.

एवढेच नाही तर, सरकारने मंजूर न केलेल्या बँक आणि पेमेंट प्लॅटफॉर्मवरून OTP मॅसेजेस देखील येणार नाहीत. अशाप्रकारे, तुमची फसवणूक आणि नुकसान होण्याची शक्यता नाहीच्या बरोबर असेल.

trai new rule for fake msgs

नव्या नियमाची कारणे

आपणा सर्वांना माहितीच आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून भारतात ऑनलाइन स्कॅम्सच्या घटना वाढतच चालल्या आहेत. स्कॅमर्स बनावट मॅसेज आणि कॉलच्या मदतीने लोकांची फसवणूक करतात. त्यामुळे ही प्रकरणे पूर्णपणे थांबवण्यासाठी TRAI ने नवा नियम सादर केला. TRAI ने युजर्सच्या सुरक्षिततेसाठी अगदी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. याव्यतिरिक्त, यापूर्वी TRAI ने टेलिकॉम ऑपरेटर्सच्या 140 सिरीज आणि सेवा प्रदात्यांकडून सुरू होणारे क्रमांक DLT म्हणजेच डिस्ट्रीब्युटेड लेजर तंत्रज्ञानाकडे वळवण्यास सांगितले होते. यामुळे कोणताही आकडा सहज शोधता येणार असून फसवणुकीच्या वाढत्या घटना कमी करता येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo