TRAI Message Traceability: स्पॅम आणि फ्रॉड SMS पासून होणार सुटका! ‘या’ दिवशीपासून लागू होणार नवीन नियम
TRAI ने 20 ऑगस्ट 2024 रोजी हा नवीन मेसेज ट्रेसिबिलिटी नियम लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मात्र, ही मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
आता मेसेज ट्रेसेबिलिटी नियम 11 डिसेंबरपासून लागू होणार आहे.
TRAI Message Traceability: आजकालच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांची प्रकरणे झपाट्याने वाढत चालली आहेत. दररोज आपण बातम्यांमध्ये सामान्य जनतेची फसवणूक झाल्याचे वाचत असतो. यामध्ये कधी स्पॅम कॉलद्वारे लोकांची फसवणूक केली जाते, तर कधी SMS द्वारे बनावट लिंक पाठवून त्यांना बळी बनवले जाते. सायबर गुन्हेगारांच्या या प्लॅन्सना हाणून पाडण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण TRAI सतत नवे निर्णय आणत आहे. काही काळापूर्वी TRAI ने स्पॅम आणि स्पॅम मेसेजेसना आळा घालण्यासाठी ‘मेसेज ट्रेसेबिलिटी’ नियम लागू करण्याची माहिती दिली होती.
Also Read: आत्ताच बजेट प्लॅन करा! भारतात लाँचपूर्वीच आगामी iQOO 13 ची किंमत Leak, मिळतील Powerful फीचर्स
पुन्हा मुदतीत वाढ
दरम्यान, TRAI ने 20 ऑगस्ट 2024 रोजी हा नवीन मेसेज ट्रेसिबिलिटी नियम लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या आदेशात 1 नोव्हेंबरपासून सर्व व्यावसायिक मॅसेज ट्रेसेबल करण्यात यावेत, असे म्हटले होते. मात्र, नंतर ही मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली, त्यानंतर हा नियम 1 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून लागू होणार होता.
अखेर आता पुन्हा एकदा त्याची मुदत वाढवण्यात आली आहे. TRAI ने आपल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे की, आता मेसेज ट्रेसेबिलिटी नियम 11 डिसेंबरपासून लागू होणार आहे. 11 डिसेंबरनंतर, टेलीमार्केटिंग सिरीजचा भाग नसलेले सर्व SMS स्वीकारले जाणार नाहीत.
नवे नियम ‘अशा’प्रकारे करेल काम
नवीन नियमानुसार, सर्व संस्था आणि टेलीमार्केटरना सांगण्यात आले होते की ते त्यांच्या टेलीमार्केटिंग SMS साठी नंबर सीरीज घोषित करतील, ज्याद्वारे SMS पाठवले जाईल. TRAI या सिरीज आपल्या डेटामध्ये समाविष्ट करेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, केवळ डेटामध्ये समाविष्ट केलेले टेलीमार्केटिंग मॅसेजेस पुढे पाठवण्यासाठी स्वीकारले जातील. जर कोणताही मेसेज या सिरीजबाहेरचा असेल तर तो स्वीकारला जाणार नाही. तसेच, युजर्सपर्यंत पोहचणार नाही, जेणेकरून तुम्हाला याचा त्रास होणार नाही.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile