SIM Card New Rule: TRAI जारी केले नवे नियम, अन्यथा भरावा लागेल 10 लाख रुपये दंड

SIM Card New Rule: TRAI जारी केले नवे नियम, अन्यथा भरावा लागेल 10 लाख रुपये दंड
HIGHLIGHTS

TRAI ने मोबाईल सिमकार्डचे नियम बदलले आहेत.

नवीन सिमकार्ड नियम 10 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

नियमांचे उल्लंघन केल्यास विक्रेत्याला तब्बल 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

बनावट मोबाईल SIM कार्डमुळे सर्वाधिक फसवणुकीच्या घटना होत आहेत. या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशा परिस्थितीत TRAI ने मोबाईल सिमकार्डचे नियम बदलले आहेत. एका अहवालानुसार, बनावट सिम कार्ड कनेक्शन विक्रीच्या ठिकाणाहून सक्रिय करण्यात आले होते. अशा परिस्थितीत फसवणूक रोखण्यासाठी ट्रायने सिमकार्ड विकणाऱ्या घाऊक विक्रेत्यांसाठी नियम कडक केले आहेत. 

नवे नियम कधी पासून लागू होणार? 

आम्ही तुम्हाला सांगतो की, नवीन सिमकार्ड नियम 10 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. 30 सप्टेंबरनंतर जर कोणी नोंदणीशिवाय सिम विकताना आढळले, तर त्या विक्रेत्याला तब्बल 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.

sim cards

सिम विकण्यासाठी परवाना आवश्यक 

आता कोणीही सिमकार्ड विकू शकणार नाही, त्यासाठी अधिकृत परवाना घ्यावा लागेल. परवाना मिळवण्यासाठी अधिक कठोर प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी Aadhar आणि Passport सारखे व्हेरिफिकेशन होईल, तसेच पोलिस व्हेरिफिकेशनही केले जाणार आहे. तुमच्या नावावर कोणताही फौजदारी गुन्हा नोंदवलेला असेल तर तुम्‍हाला सिम कार्ड विकण्‍याचा परवाना दिला जाणार नाही. त्याबरोबरच, तुमच्या एजंट आणि डिस्ट्रिब्युटरचेही पोलिस वेरिफिकेशन होईल.

आवश्यक कागदपत्र 

sim card rules

टेलिकॉम ऑपरेट पॉइंट ऑफ सेलची नोंदणी आणि पडताळणी तपासावी लागेल. त्यासाठी, सिम विक्रेत्याला आधार आणि पासपोर्ट तपशीलांसह कॉर्पोरेट ओळख क्रमांक आणि व्यवसाय परवाना यांसारखी काही कागदपत्रे द्यावे लागतील. याशिवाय कामाचा पत्ता, स्थानिक निवासाची माहिती, आधार आधारित ई-KYC सारखे बायोमेट्रिक तपशील द्यावे लागतील.

मिळेल युनिक ID 

TRAI द्वारे एक युनिक PoS ID जारी केला जाईल. यासाठी तुम्हाला TRAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. वैध PoS आयडी असलेले विक्रेतेच ग्राहकांची नोंदणी करू शकतील. सिमकार्ड विक्रेते नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांचा ID ब्लॉक केला जाईल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo