तुमच्या मनोरंजनासाठी चित्रपटगृहात आणि OTTवर बऱ्याच प्रसिद्ध आणि मनोरंजक चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज झाले आहेत. काही सिरीज आणि चित्रपट असे असतात की, ज्या एकदा पाहिल्यानंतरही कंटाळा येत नाही, पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. आता अशा परिस्थितीत, तुम्ही नेटफ्लिक्स, MX प्लेयर आणि ZEE5 व्यतिरिक्त कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर काही चित्रपट आणि सिरीज पाहून स्वतःचे मनोरंजन करू शकता. चला तर जाणून घेऊयात टॉप OTT कंटेन्ट कोणता ? बघा यादी…
ZEE5 ने काही काळापूर्वी OTT वर अभिनेता जॉन अब्राहमच्या 'अटॅक पार्ट 1' च्या आगमनाची घोषणा केली. आता हा चित्रपट OTT वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. 27 मे रोजी, ZEE5 वर "अटॅक: पार्ट 1" या सायन्स-फिक्शन ऍक्शन फिल्मचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर आयोजित करण्यात आला. या चित्रपटात जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्य राज आनंद यांनी केले आहे.
हे सुद्धा वाचा : Xiaomi युजर्सची मज्जाच मजा! तीन महिने फ्री मध्ये बघा प्रीमियम सर्व्हिसचे ऑनलाइन व्हिडिओ
SS राजामौली यांच्या RRR ने पहिल्यांदा मेगास्टार्स ज्युनियर NTR आणि राम चरण यांना एकत्र आणून पडद्यावर यशस्वीपणे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवला. कोविड-19 मुळे उशीर झाला असला तरी, 25 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या साऊथ चित्रपटाने सर्व विक्रम मोडले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1,000 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आमिर खानच्या पीकेला मागे टाकून RRR हा चौथा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आहे.
आता सर्व चाहत्यांसाठी एक रोमांचक बातमी आहे. ज्यांना हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्याची व्यवस्था करता आली नाही. तरी तुम्ही हा चित्रपट बघण्यासाठी आतुर झाले आहात, तर हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
आश्रममधील बॉबी देओलचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. मात्र, ही सिरीज अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली. आता लोकांना त्याच्या पुढच्या सीझनची वाट पाहण्याची गरज नाही. वेब सिरीजचा नवा सीझन MX Player वर रिलीज होणार आहे.
शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर अभिनित स्पोर्ट ड्रामा फिल्म 'जर्सी' थिएटरनंतर आता OTT वर आली आहे. हा चित्रपट तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाला तेलुगूमध्ये राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. कोरोनामुळे अनेकवेळा विलंब झाल्यानंतर अखेर 22 एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज झाला. त्यानंतर हा चित्रपट 20 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.