उन्हाळा आला आहे आणि अनेकांनी नवीन AC घेण्यासही सुरुवात केली आहे. जर तुम्हीही या वर्षी घरात नवीन एअर कंडिशनर लावण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी तुम्ही काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक हे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या फिचर्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला नवीन एसी खरेदी करण्यापूर्वी जाणून घेणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा : वर्षभरासाठी दररोज 2 GB डेटा ऑफर करणारा AIRTELचा परवडणारा प्लॅन, जाणून घ्या किंमत
नवीन एसी खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही जो मॉडेल एसी खरेदी करणार आहात, ते इन्व्हर्टर तंत्रज्ञानासह आहे की नाही हे नक्की तपासून घ्या. ही टेक्नॉलॉजी विजेची बचत करण्यास मदत करते. इन्व्हर्टर AC जास्त वीज न वापरता खोलीचे तापमान राखण्यास मदत करतो.
जर तुम्हाला बजेटची समस्या नसेल तर तुम्ही 5 स्टार AC घ्या. पण तुमचे बजेट कमी असेल तर 3 स्टार AC जरूरच घ्यावे. AC मध्ये स्टार रेटिंग खूप महत्वाचे आहे, जितके जास्त रेटिंग तितकी विजेची बचत होते.
नवीन AC खरेदी करताना, तुम्ही खरेदी करत असलेल्या एसीमध्ये कोणता कंप्रेसर दिला आहे, याकडे लक्ष द्या. कॉपर कंप्रेसर पारंपारिक कंप्रेसरपेक्षा चांगले आणि अधिक टिकाऊ असतात. म्हणूनच, सल्ला दिला जातो की नवीन AC घेताना कॉपर कंडेन्सर असलेले मॉडेलच खरेदी करावे.