Amazon Prime Day 2022 सेल लवकरच सुरू होणार आहे. यावेळी, मोबाईल फोन ऍमेझॉन उपकरणे, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सवर प्रचंड सूट दिली जाणार आहे. हा सेल 23 जुलैपासून सुरू होणार आहे. दोन दिवसांच्या या सेलमध्ये प्राइम मेंबर्सना अनेक ऑफर्स देण्यात येणार आहेत. जर तुमच्याकडे अद्याप प्राइम सबस्क्रिप्शन नसेल, तर आज आम्ही तुम्हाला प्राइम मेंबरशिप जवळपस मोफतच मिळेल, याबाबत थोडी माहिती देणार आहोत.
हे सुद्धा वाचा : Amazon Prime Day Sale 2022: सेलपूर्वी सर्व प्रकारच्या सवलती, डील्स आणि ऑफर जाणून घ्या
कंपनीने फ्री ट्रायल देणे बंद केले आहे. पण तरीही तुम्ही भारतात Amazon Prime Video साठी 30 दिवसांची फ्री ट्रायल घेऊ शकता. मात्र, हे केवळ तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही यापूर्वी कधीही Amazon Prime चे सदस्यत्व घेतले नसेल. म्हणजेच, जर तुम्ही यापूर्वी Amazon चे सदस्यत्व घेतले नसेल तर तुम्ही 30-दिवसांची फ्री ट्रायल वापरण्यास सक्षम असाल. त्याबरोबरच, या दोन दिवसीय सेलमध्ये प्रचंड सवलती आणि ऑफर्ससह मस्त शॉपिंग करा.
Airtel, Jio आणि Vi त्यांच्या ग्राहकांना मोफत Amazon प्राइम सबस्क्रिप्शनसह प्लॅन्स ऑफर करतात. यापैकी काही प्लॅन्स कॉम्प्लिमेंट्री ऍक्सेस देखील दतात. भारतातील मोबाईल आणि ब्रॉडबँड ऑपरेटर दोन्ही निवडक प्लॅन्ससह Amazon प्राइम सबस्क्रिप्शन ऑफर करतात.
Airtel ग्राहकांसाठी, मोफत Amazon प्राइम सबस्क्रिप्शन 349 रुपये, 499 रुपये, 749 रुपये, 999 रुपये आणि 1,599 रुपये या प्लॅनवर उपलब्ध आहे.
त्याबरोबरच, मोफत Amazon प्राइम सबस्क्रिप्शन सेवा Jio ग्राहकांसाठी 399 रुपये (पोस्टपेड प्लस), 599 रुपये, 799 रुपये (पोस्टपेड प्लस), 899 रुपये (पोस्टपेड प्लस) आणि 1,499 रुपये (पोस्टपेड प्लस) या प्लॅन्सवर उपलब्ध आहे.
याव्यतिरिक्त, Vi ग्राहकांना Amazon प्राइम सबस्क्रिप्शन सेवा 499 रुपये (पोस्टपेड), 699 रुपये (पोस्टपेड), आणि 1,099 रुपये (पोस्टपेड) या प्लॅनमध्ये दिली जात आहे.