हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांनी स्थापन केलेल्या 'यशराज फिल्म्स' या प्रॉडक्शन हाऊसला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने OTT Netflix त्यांच्यावर एक डोक्यूसिरीज प्रसारित करणार आहे. 'द रोमँटिक्स' या चार भागांच्या सिरीजमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार यश चोप्रा यांच्याशी त्यांच्या नातेसंबंधांबद्दल बोलताना दिसतील.
हे सुद्धा वाचा : वर्षभराच्या वैधतेसह येतो JIO चा जबरदस्त प्लॅन, मिळतील सिक्योरिटी फायदे आणि बरेच काही…
मिळालेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारीपासून म्हणेजच व्हॅलेंटाईन डे पासून Netflix वर ही सिरीज प्रसारित होणार आहे. आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, रणवीर सिंग, राणी मुखर्जी, हृतिक रोशन, अनुष्का शर्मा ते लेखक सलीम खान डॉक्युसिरीज 'द रोमँटिक्स'च्या मेकिंगदरम्यान दिसले.
'द रोमॅंटिक्स' चे दिग्दर्शन स्मृती मुंधरा यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी 'इंडियन मॅचमेकिंग' आणि 'नेव्हर हॅव आय एव्हर' सारख्या लोकप्रिय सिरीज दिग्दर्शित केल्या आहेत. द रोमँटिक्समध्ये स्टार्सच्या मुलाखतींचा समावेश आहे. यामध्ये दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या एका रोचक मुलाखतीचाही समावेश आहे. इतकंच नाही तर यशराज फिल्म्सचे प्रमुख आदित्य चोप्राने द रोमॅंटिक्ससाठी त्यांची पहिली ऑन कॅमेरा मुलाखतही रेकॉर्ड केली आहे.
'द रोमँटिक्स'च्या ट्रेलरला देशात आणि जगात भरभरून दाद मिळाली आहे. यश चोप्रांना श्रद्धांजली अर्पण करून ही सिरीज 14 फेब्रुवारीपासून प्रसारित होणार आहे. भारतातील 'फादर ऑफ रोमान्स' मानले जाणारे यश चोप्रा यांनी 'सिलसिला', 'लम्हे', 'कभी कभी', 'वीर जरा', 'दिल तो पागल है', 'चांदनी' आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' यांसारख्या चित्रपटांनी आपल्या चाहत्यांना भुरळ घातली आहे. 'जब तक है जान' सारखे लोकप्रिय रोमँटिक चित्रपट दिले आहेत.