‘द काश्मीर फाइल्स 2’ ची प्रतीक्षा अखेर संपणार आहे, विवेक अग्निहोत्रीकडून रिलीज डेट जाहीर
'द काश्मीर फाइल्स 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
विवेक अग्निहोत्री कडून चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
परत एकदा पंडितांची व्यथा पडद्यावर येईल.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. सुमारे 15 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने केवळ सिनेमागृहातून 340 कोटींची कमाई केली. काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराची कहाणी मांडणाऱ्या या चित्रपटाने सर्वांनाच हादरवून सोडले आणि तेव्हापासून या चित्रपटाचा दुसरा भाग कधी येणार, असा प्रश्नही प्रेक्षकांकडून सातत्याने विचारला जात आहे.
हे सुद्धा वाचा : JIOच्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनमध्ये NETFLIX आणि PRIME VIDEO मोफत, पूर्ण बेनिफिट बघा
दरम्यान, आजही काश्मिरी पंडितांवर होत असलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ शेअर करताना एका यूजरने लिहिले की, ''खोऱ्यात काश्मिरी पंडितांची सातत्याने हत्या होत आहे, पण स्वतःला हिंदूंचे ठेकेदार म्हणवणारे सरकार अजूनही झोपले आहे. सततच्या हत्या, अत्याचारांनी त्यांना काही फरक नाही पडत. गोष्टी खूप वाईट आहेत. काश्मिरी पंडित 90 च्या दशकातील संकटातून जात आहेत.''
@vivekagnihotri इसपर एक #KashmirFiles बना सकेंगे क्या? https://t.co/QzoDQ7CCUX
— Shreyansh Tripathi (@shreyanshhvns) October 17, 2022
'द काश्मीर फाइल्स 2'
हे ट्विट रिट्विट करत श्रेयांश त्रिपाठीने विवेक अग्निहोत्रीला टॅग केले आणि विचारले – विवेक अग्निहोत्री यावर काश्मीर फाइल्स बनवू शकेल का? यानंतर विवेक अग्निहोत्रीने ट्विटला दिलेले उत्तर हे करोडो यूजर्सच्या प्रश्नाचे उत्तर आहे. विवेक अग्निहोत्रीने लिहिले की, ''होय, काम सुरू आहे. 2023 च्या मध्यापर्यंत थांबा.''
म्हणजेच 2023 च्या मध्यापर्यंत काश्मीर फाइल्सचा दुसरा भाग येईल, असे विवेक अग्निहोत्री यांनी स्पष्ट केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांच्या समस्या आणि त्यांचे दुःख देशापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आजही काश्मीरमधून पंडितांच्या हत्या आणि गैरवर्तनाच्या बातम्या येत असतात.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile