Thank God Trailor : अजय म्हणतो, ‘बिग बीं’ना यमलोकमधून मिळाली KBCची आयडिया, बघा मजेशीर ट्रेलर

Thank God Trailor : अजय म्हणतो, ‘बिग बीं’ना यमलोकमधून मिळाली KBCची आयडिया, बघा मजेशीर ट्रेलर
HIGHLIGHTS

Thank God चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर रिलीज

अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राची कॉमेडी

म्हणे, " सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना यमलोकमधून मिळाली KBCची आयडिया"

बॉलीवूड सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंग स्टारर चित्रपट 'थँक गॉड' सध्या खूप चर्चेत आहे. थँक गॉडच्या निर्मात्यांनी अलीकडेच त्याचा खास ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज केला, ज्याला त्यांनी 'दिवाळी ट्रेलर' असे नाव दिले आहे. ट्रेलरच्या एका सीनमध्ये चित्रगुप्त बनलेला अजय देवगण म्हणतो की, अमिताभ बच्चन यांना यमलोकमधून कौन बनेगा करोडपती – KBC या क्विझ शोची कल्पना सुचली. 

हे सुद्धा वाचा : Excital चा फास्ट 400 mbps स्पीडचा आकर्षक प्लॅन, Jio-Airtel पेक्षा उत्तम आहे 'हा' ब्रॉडबँड प्लॅन

खरं तर, थँक गॉडच्या स्पेशल ट्रेलरमध्ये सिद्धार्थ मल्होत्राची व्यक्तिरेखा जीवन आणि मृत्यूमध्ये अडकल्याचे दिसून येतेय, त्यामुळे तो खूपच गोंधळलेला दिसत आहे. जेव्हा तो यमलोकात पोहोचतो, तेव्हा चित्रगुप्ताच्या भूमिकेत असलेला अजय देवगण त्याच्याशी संस्कृतमध्ये बोलतो. जेव्हा सिद्धार्थला हे समजत नाही, तेव्हा अजय देवगणचा लूक पूर्णपणे बदलतो आणि मग ट्रेलरमध्ये गमतीशीर विनोद सुरू होतो. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

यमलोकमधून सुचली KBC शोची आयडिया

अजय देवगण सिद्धार्थला गेम खेळण्यास सांगत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे, ज्यावर सिद्धार्थ म्हणतो की येथेही गेम शो. यानंतर, ट्रेलरच्या एका सीनमध्ये अजय सिद्धार्थला सांगतो की, पृथ्वीचे प्रसिद्ध सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी यमलोकमधूनच त्याच्या 'कौन बनेगा करोडपती' शोची कल्पना चोरली. अजय म्हणतो की, तो यमलोकात आला, शो जिंकला आणि मग पृथ्वीच्या खाली त्याचा शो सुरू केला. असे मजेशीर विनोद सुरु असल्याने सोशल मीडिया यूजर्स या ट्रेलरला फनी म्हणत एन्जॉय करताना दिसत आहेत.

चित्रपटावर वाद सुरु 

चित्रपटात अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नोरा फतेही चित्रपटातील एका गाण्यात दिसली आहे. सिद्धार्थ आणि नोराची गाणी प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहेत. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाबाबत बराच वादही रंगला असून यातून धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे बोलले जात आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo