रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण (47th RIL AGM) सभेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. लक्षात घ्या की, आतापर्यंत AI तंत्रज्ञानाबद्दल आपण ऐकत आलो आहोत, परंतु आता ते लवकरच आपल्या हातात येणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 47 व्या RIL AGM च्या व्यासपीठावरून भारतात Jio Brain लाँच केले आहे. जिओ ब्रेन खूप शक्तिशाली आणि AI तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल, असे सांगण्यात येत आहे.
Jio Brain हे AI पॉवर्ड प्लॅटफॉर्म आहे, जे रिलायन्स जिओ अंतर्गत सादर केले जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे मशीन लर्निंग क्षमतेसह सुसज्ज नेटवर्क असेल, जे प्रत्येक मोबाइल वापरकर्त्यासाठी विस्तारित केले जाणार आहे. लक्षात घ्या की, कंपनीने गुजरातमधील जामनगर येथे जिओ ब्रेनसाठी गिगावॅट-स्केल AI-रेडी डेटा सेंटर देखील सुरू केले आहे. भारतात JioBrain सादर करताना मुकेश अंबानी म्हणाले की, “कृत्रिम बुद्धिमत्ता हा आपल्या दैनंदिन दिनक्रमाचा एक महत्त्वाचा भाग बनत आहे, त्यामुळे AI सेवांची सुविधा Jio नेटवर्कवर देखील उपलब्ध असेल.”
महत्त्वाचे म्हणजे मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, “जिओब्रेनच्या माध्यमातून भारतीय वापरकर्त्यांना परवडणारी AI सेवा पुरविली जाईल, जी संपूर्ण जगात सर्वात स्वस्त असेल. सध्या AI सुविधा केवळ महागड्या स्मार्टफोन्सवरच पुरवल्या जात आहेत, पण स्वस्त मोबाइल फोनवरही AI सेवा पुरवण्याचे रिलायन्स Jio चे उद्दिष्ट आहे.”
जिओब्रेन प्रामुख्याने रिटेल, मनोरंजन, शेती, आरोग्यसेवा आणि शिक्षण या क्षेत्रात सक्रियपणे कार्य करेल.
AI Vyapaar: जिओब्रेन रिटेलशी संबंधित लोकांना एआय व्यवसायाच्या रूपात सुविधा पुरवेल. ही एक पूर्णपणे वैयक्तिकृत सेवा असेल जी एका छोट्या शहरात काम करणाऱ्या दुकानदाराला जागतिक स्तरावर त्यांचे कार्य वाढविण्यात मदत करेल.
AI एंटरटेनमेंट: याद्वारे वापरकर्त्यांच्या सोयीसाठी मनोरंजनाच्या क्षेत्रात देखील काम होणार आहे. होय, एखाद्या व्यक्तीला फक्त ते कंटेंट रिकमेंड केले जाईल, ज्यामध्ये त्याला स्वारस्य आहे.
AI फार्मर्स: जिओ ब्रेनद्वारे शेतीमध्येही चांगले विकास करता येईल. या तंत्रज्ञानाद्वारे हवामान समजण्यापासून ते जमिनीच्या सुपीकतेपर्यंतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, त्यानुसार ते पिकाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतील. चांगल्या खतापासून ते कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापर्यंतचे प्रश्नही या माध्यमातून सोडवता यातील.
AI टीचर्स: AI तंत्रज्ञान हे शैक्षणिक जगामध्ये एक मोठी प्रगती सिद्ध होईल. जिओब्रेनद्वारे उच्च दर्जाचे शिक्षण देण्याचे लक्ष्य आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे शिक्षण लहान शहरे आणि ग्रामीण भागातही उपलब्ध होणार आहे. प्रगत असण्यासोबतच ते परवडणारेही असेल ज्याचा फायदा सामान्य माणूस देखील घेऊ शकतो.
AI डॉक्टर्स: या तंत्रज्ञानाद्वारे, सामान्य जनता आणि आरोग्य सेवा प्रदाते यांच्यात एक कनेक्शन स्थापित केले जाईल ज्याद्वारे 24X7 मदतीचा लाभ घेता येईल. दुर्गम भागात राहणारे लोक देखील डॉक्टरांशी सहज बोलू शकणार आहेत.