आगामी TECNO POVA 6 Pro स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म! Powerful फीचर्ससह मिळेल 108MP कॅमेरा। Tech News 

आगामी TECNO POVA 6 Pro स्मार्टफोनची भारतीय लाँच डेट कन्फर्म! Powerful फीचर्ससह मिळेल 108MP कॅमेरा। Tech News 
HIGHLIGHTS

TECNO POVA 6 Pro स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी

हा फोन भारतात या महिन्याच्या अखेरीस लाँच केला जाईल.

हा फोन यापूर्वी MWC 2024 मध्ये सादर करण्यात आला होता.

Tecno ने आपल्या आगामी TECNO POVA 6 Pro स्मार्टफोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन यापूर्वी MWC 2024 मध्ये सादर करण्यात आला होता. ग्लोबल मार्केटमध्ये फोन MediaTek Dimensity 6080 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे, ज्यामध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात TECNO POVA 6 Pro फोनचे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-

हे सुद्धा वाचा: Infinix Note 40 Pro 5G सिरीजचे इंडिया लाँच Confirm! अखेर Flipkart वर मायक्रोसाइट Live। Tech News

TECNO POVA 6 Pro चे भारतीय लाँच

कंपनीने प्रेस रिलीजद्वारे पुष्टी केली आहे की, कंपनीने आपला नवीनतम स्मार्टफोन TECNO POVA 6 Pro सादर करण्यासाठी Rusk Media Playground सीझन 3 सह कोलॅब्रेशन केले आहे. वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने हा फोन गेल्या महिन्यात MWC 2024 दरम्यान सादर केला होता. अखेर कंपनीने फोनच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी केली आहे. हा फोन 29 मार्च रोजी भारतात लाँच केला जाईल.

TECNO Pova 6 Pro 5G

TECNO POVA 6 Pro चे फीचर्स

कंपनीने यापूर्वी MWC 2024 मध्ये TECNO POVA 6 Pro जागतिक बाजारपेठेत सादर केला आहे. त्यामुळे या फोनचे फीचर्स आधीच उघड झाले आहेत. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. याशिवाय, हा फोन 6nm MediaTek Dimensity 6080 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज उपलब्ध आहे. या फोनची रॅम 24GB पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर, पॉवरसाठी फोनची बॅटरी 6000mAh आहे, ज्यामध्ये 70W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 10W रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. 20 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये फोन 50 टक्के चार्ज होतो, असे कंपनीने सांगितले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo