जर तुम्ही टॅबलेट शोधत असाल जो चांगला परफॉर्मन्स देतो आणि खिशाला जास्त जड नसेल. तर तुमचा शोध आता संपला आहे. ब्रँडने TCL Tab 10 5G हा नवीन टॅब लाँच केला आहे. नवीन टॅब 5G सपोर्ट तसेच मोठी बॅटरी, फास्ट कनेक्टिव्हिटी आणि परवडणाऱ्या किमतीसह येतो. याशिवाय, टॅबमध्ये एक मोठा फुल-HD डिस्प्ले आणि दीर्घ बॅटरी लाईफ देखील आहे. जाणून घेऊयात टॅबची किंमत आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती…
TCL Tab 10 5G, T-Mobile नेटवर्कवर उपलब्ध आहे. Tab 10 5G ची किंमत $300 हणजेच सुमारे 24 हजार रुपये आहे.
मिळतील दमदार सिक्योरिटी फीचर्स
TCL Tab 10 5G हा एक स्वस्त टॅबलेट आहे, जो Samsung Galaxy A7 Lite ला स्पर्धा देतो. यात मोठी स्क्रीन, मोठी बॅटरी आहे. तसेच Galaxy A7 Lite टॅबलेटपेक्षा या टॅबची किंमत कमी आहे. टॅबलेटचा डिस्प्ले कंपनीच्या NXTVISION ग्रुपने बनवला आहे. टॅब 10 5G च्या कॅमेरा सेटअपमध्ये 8MP रिअर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा समाविष्ट आहे. टॅब 10 5G फेस आयडेंटिफिकेशन फिचरसह येतो आणि एक्सट्रा सिक्योरिटी फिचर म्हणून फेस अनलॉक देखील यामध्ये आहे.
TCL Tab 10 5G फास्ट नेटवर्क कनेक्टिव्हिटी देतो. दीर्घ बॅटरी लाईफमुळे चार्ज न करता टॅब प्रवासात अनेक तास वापरता येतो. टॅबलेट Android 12 वर चालतो आणि 4GB RAM आणि 32GB स्टोरेज आहे. टॅब MediaTek Kompanio 800T प्रोसेसरवर काम करतो.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.