OTT पाहणाऱ्यांची मजा! Tata Play 59 रुपयांमध्ये ऑफर करतोय 17 OTT ऍप्सचे सबस्क्रिप्शन
Tata Play Binge हे भारतातील सर्वात मोठे DTH ऑपरेटर
Tata Play Binge सह 17 OTT प्लॅटफॉर्मचे सब्स्क्रिप्शन उपलब्ध
अनेक प्लॅन्स 59 रुपये ते 299 रुपये प्रति महिना सुरू होतात.
Tata Play Binge हे भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठे डायरेक्ट-टू-होम DTH ऑपरेटर आहे. आता टाटा प्लेने अनेक OTT प्लॅटफॉर्मवर सेवा देणे सुरू केले आहे. टाटा प्लेने वापरकर्त्यांना 17 OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश देणे सुरू केले आहे. वापरकर्ते सर्वात लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मवर फक्त 59 रुपयांमध्ये प्रवेश मिळवू शकतात.
हे सुद्धा वाचा : Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये 'हे' स्मार्टफोन्स सर्वात स्वस्त, बघा यादी
टाटा प्लेने MX Player Binge सबस्क्रिप्शनमध्ये जोडले आहे. MX Player हे भारतातील एक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे आणि हिंदी, तमिळ, तेलगू आणि अधिकसह अनेक भाषांमध्ये 5000+ चित्रपट आणि 800+ टीव्ही शोमध्ये प्रवेश प्रदान करेल. MX Player चे 300 दशलक्ष पेक्षा जास्त सदस्य आहेत. MX Originals, Hollywood Movies, Bollywood Movies, Korean Dramas आणि बरेच काही आहेत.
Tata Play Binge सह 17 OTT प्लॅटफॉर्म उपलब्ध
येथे 17 OTT प्लॅटफॉर्म आहेत, ज्यात वापरकर्ते Tata Play Binge सबस्क्रिप्शनसह प्रवेश करू शकतील. Disney+ Hotstar, Zee5, SonyLIV, Voot Select, MX Player, Hoichoi, Choupal, Namma Flix, Planet Marathi, Sun NXT, Hungama Play, Eros Now, ShemarooMe, Voot Kids, Curiosity Stream, Epic On आणि Docube या प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही प्रवेश मिळवू शकता. लक्षात घ्या की, Tata Play Binge सह विविध सबस्क्रिप्शन टियर आहेत. अनेक प्लॅन्स 59 रुपये ते 299 रुपये प्रति महिना सुरू होतात. Tata Play Binge हे सध्या भारतातील सर्वोत्तम OTT बंडल सब्स्क्रिप्शन्सपैकी एक आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile