मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी स्वाइपने एक नवीन टॅबलेट स्वाइप X703 ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडिल ७,४९९ रुपयात लिस्ट केले आहे. हा टॅबलेट पांढ-या रंगात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
स्वाइप X703 टॅबलेटमध्ये १०.१ इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1280×800 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 160ppi आहे. हा टॅबलेट 1.3GHz क्वाड कोर मिडियाटेक (MTK8321) प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 1GB ची रॅमसुद्धा दिली आहे. हा अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
ह्या टॅबलेट्समध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे. ह्या स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात 6000mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी 6 तासांचा प्ले टाइम देते. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. ह्यात 3G, कॉलिंग, वायफाय, ब्लूटुथ, GPS सारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – पावसाळ्याच्या दिवसात खूपच फायद्याचे ठरतील हे वॉटरप्रूफ स्मार्टफोन्स
कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, हा 5 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. ह्या रियर कॅमे-यासह LED फ्लॅशसुद्धा दिला गेला आहे. ह्यात 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ह्याचे वजन ५२५ ग्रॅम आहे.
हेदेखील वाचा – “फ्रीडम 251” स्मार्टफोनची डिलिवरी लांबणीवर, ६ जुलैपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा
हेदेखील वाचा – HTC डिझायर 626 ड्यूल सिम स्मार्टफोनची किंमत झाली कमी