'इंडियन ऑफ द इयर' पुरस्काराने अल्लू अर्जुन सन्मानित
अल्लू अर्जुनला न्यूयॉर्कमधील वार्षिक इंडियन डे परेडमध्ये ग्रँड मार्शल म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन सिनेजगतात धमाका करत आहे. तर दुसरीकडे त्याच्या जोरदार कामगिरीने अनेक मान-सन्मानही त्याला मिळत आहेत. काही काळापूर्वी अल्लू अर्जुनला न्यूयॉर्कमधील वार्षिक इंडियन डे परेडमध्ये ग्रँड मार्शल म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तर, त्यानंतर आता 'पुष्पा' फेम अभिनेत्याला 'इंडियन ऑफ द इयर' म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. अल्लू अर्जुनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अलीकडेच दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिथे अल्लू अर्जुनला मनोरंजन उद्योगासाठी 'इंडियन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अल्लू अर्जुनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा सन्मान जिंकल्यानंतर अल्लू म्हणाला, “मी 20 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे. मला दक्षिणेत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, उत्तरेकडून पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे माझ्यासाठी हे खूप खास आहे."
एवढेच नाही तर अल्लू अर्जुनने 'पुष्पा', 'पुष्पा… पुष्पराज, मैं झुकेगा नही साला' या सुपरहिट डायलॉगला नवा ट्विस्टही दिला, तो म्हणजे 'इंडियन सिनेमा… भारत कभी झुकेगा नही'. अल्लूचा हा स्वॅग इव्हेंटमध्ये उपस्थित लोकांना खूप आवडला. अल्लूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला चाहत्यांसह सेलिब्रिटी देखील आपली पसंती दर्शवत आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.