नुकतेच अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. 26 वर्षीय भारतीय इंजिनियर Suchir Balaji हा सॅन फ्रान्सिस्कोमध्ये मृतावस्थेत आढळला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा तोच भारतीय अमेरिकन कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संशोधक आहे, ज्याने OpenAI बद्दल जगाला सतर्क केले. बालाजीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तो त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. जाणून घेऊयात सविस्तर-
सूचित बालाजी यांच्या अचानक झालेल्या निधनाबद्दल सॅन फ्रान्सिस्को पोलिस विभागाचे प्रवक्ते अधिकारी रॉबर्ट रुएका यांनी सांगितले की, प्राथमिक तपासादरम्यान काही चुकीचे झाल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, मीडिया रिपोर्टनुसार बालाजीचा मृतदेह 26 नोव्हेंबर रोजी त्यांच्या बुकानन स्ट्रीट अपार्टमेंटमध्ये सापडला होता. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्याने नोव्हेंबर 2020 ते ऑगस्ट 2024 पर्यंत OpenAI साठी काम केले आहे.
बालाजी ही अशी व्यक्ती होती, ज्यांनी केवळ AI मध्ये कामच केले नाही तर, या कंपनीतील चुकीच्या परंपरा आणि ऍक्टिव्हिटीज विरोधात जोरदार आवाज देखील उठवला. सुचीरने माहिती दिली होती की, OpenAI ने पत्रकार, लेखक, प्रोग्रामर इत्यादींच्या कॉपीराइट केलेल्या कंटेंटचा वापर चॅट GPT तयार करण्यासाठी परवानगीशिवाय केला आहे. याचा थेट परिणाम अनेक व्यवसाय आणि व्यापारांवर होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे OpenAI विरुद्ध सुरू असलेल्या कायदेशीर खटल्यांमध्ये तो महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास होता.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक दिग्गज अब्जाधीश एलोन मस्क यांचे OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांच्याशी दीर्घकाळ वाद सुरू आहे. अशा स्थितीत सुचीर यांच्या मृत्यूशी संबंधित एका पोस्टवर मस्कने जरी केले आणि ‘हम्म’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही ही पोस्ट वर दिलेल्या लिंकमध्ये पाहू शकता.