Star Health Insurance Leak: एक चिंताजनक अहवाल ऑनलाइन समोर आला आहे. अहवालानुसार, लाखो लोकांचा डेटा लीक झाला आहे, असा दावा केला जात आहे. Deedy दास, Menlo Ventures चे VC ज्यांनी यापूर्वी Google सोबत काम केले होते, त्यांनी स्टार हेल्थ इन्शुरन्स ग्राहकांचे खाजगी तपशील असलेल्या सूचीसह X वर या उल्लंघनाबाबत एक अलर्ट पोस्ट केला आहे.
त्यांनी नमूद केले की, या डेटाची विक्री $150,000 म्हणजेच अंदाजे 1,26,00,000 रुपयांमध्ये झाली. त्यांच्या पोस्टमध्ये दास यांनी दावा केला आहे की, ‘हा डेटा ऍक्सेस करणाऱ्या हॅकरने स्टार हेल्थ इन्शुरन्सचे CISO अमरजीत खानुजा यांना ही माहिती विकली’ असा आरोप केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा डेटा ब्रीच भारतातील सर्वात मोठ्या उल्लंघनांपैकी एक मानला जात आहे.
त्यांनी सांगितले की, स्टार हेल्थ इन्शुरन्सचा 31 दशलक्ष लोकांचा डेटाची डील होत आहे. होय, वेबसाइटवर 31,216,953 स्टार हेल्थ ग्राहकांचा डेटा आहे, जो 7.24TB आहे. आपण या डेटासह काय ऍक्सेस करू शकता? या डेटामध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता, फोन, पॅन कार्ड आणि भारतीयांचे वेतन देखील समाविष्ट आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा डेटा त्यांना कंपनीच्या CISO अमरजीत खानुजा यांनी विकला आहे, असे देखील त्यांनी पुढे लिहले आहे. यानंतर त्यांनी ट्विटमध्ये याबाबतचे अनेक स्क्रीनशॉटही समाविष्ट केले आहेत.
हा एक मोठा डेटा लीक आहे. 3.1 कोटी पॉलिसीधारकांची वैयक्तिक माहिती चुकीच्या हातात पडल्यास त्यांना लक्ष्य केले जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे लोकांचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. लोकांची आयडेंटिटीची चोरी ही सर्वात मोठी समस्या आहे. हॅकर्स ही माहिती आर्थिक किंवा इतर फसवणूक करण्यासाठी देखील वापरू शकतात. या माहितीचा वापर करून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फसवणूक केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, याआधीही स्टार हेल्थ आणि अलाईड इन्शुरन्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ही घटना मोठी नसल्याचे स्टार हेल्थने त्यावेळी सांगितले होते. ते कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत, असे देखील सांगितले. आता डीडी दासच्या ट्विटने खळबळ उडाली आहे. ट्विटरवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत.