खगोलशास्त्रज्ञानी Hubble Space Telescope च्या माध्यमातून एका अशा ग्रहाचा शोध घेतला आहे जो वेगाने गायब होत आहे. हा गायब होणार ग्रह GJ 3470b तेच असे सांगण्यात आले आहे. संशोधकांनुसार अशाप्रकारच्या ग्रहांचे वातावरण नष्ट होते. असे झाल्यांनतर अखेरीस हा ग्रह छोटा होऊ लागतो आणि कदाचित येत्या काळात हा नष्ट पण होऊ शकतो.
अशाच ग्रहांपैकी GJ 3470b एक आहे ज्याच्याबद्दल माहिती मिळाली आहे. नेप्च्यून ग्रहांप्रमाणे GJ 3470b चा पण आकार आहे. विशेष म्हणजे याआधी पण एका ग्रहाचा शोध लावण्यात आला होता जो याचा आकाराचा होता पण हा आपल्या सुर्यमालेच्या बाहेरचा होता ग्रह होता. संशोधकांच्या मते या ग्रहाच्या तुलनेत GJ 3470b 100 पटीने नष्ट होत आहे.
या माहितीचा खुलासा संशोधकांनी ''एस्ट्रोनॉमी अँड एस्ट्रोफिजिक्स'' नावाच्या मासिकात केला आहे. या मासिकातून या शोधाची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. खगोलशास्त्रज्ञ म्हणतात की हा ग्रह ज्या वेगाने आणि ज्या अंतरावरून आपल्या ताऱ्याचे परिभ्रमण करत आहे त्यावरून स्पष्ट होत आहे की हा त्याच्या सौर्यमालेचा बराच काळ भाग असेल किंवा मग लवकरच नष्ट होईल.
अमेरिकेतील Johns Hopkins University चे प्रोफेसर David Sing यांनी सांगितले की, ''जीजे 3470बी आता पर्यंत बघितलेल्या इतर ग्रहांच्या तुलनेत आपले द्रव्यमान जास्त वेगाने गमावत आहे. पुढील काही अरब वर्षांत ग्रहआपला अर्धा द्रव्यमान गमावू शकतो.'' त्याचबरोबर त्यांनी सांगितले की ग्रह आपल्या संपूर्ण द्रव्यमानाचा एक महत्वपूर्ण अंश गमावू शकतो हे निश्चित झाले आहे.
प्रोफेसर David Sing नुसार अशा ग्रहांचे वातावरण नष्ट होते. आणि मग त्यांचे रूपांतरण छोट्या ग्रहांत होते. प्रोफेसर म्हणतात की ग्रह कसे बनतात याचा अभ्यास सुरु करण्यात आला आहे. त्याचबरोबर ग्रहांची रचना कशाने प्रभावित होते त्याची लक्षणे काय आहेत याची पण माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.