Sony Xperia XZ2 टॅबलेट 8 आणि 10 इंचाचा वेरियंट मध्ये लवकरच होऊ शकतो लॉन्च

Sony Xperia XZ2 टॅबलेट 8 आणि 10 इंचाचा वेरियंट मध्ये लवकरच होऊ शकतो लॉन्च
HIGHLIGHTS

अशा आहे की Sony चे हे नवीन टॅबलेट एंड्रॉयड सह येतील.

Sony ने आपला शेवटचा टॅबलेट 2015 मध्ये लॉन्च केला होता, तेव्हा पासुन कंपनी नव नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यावर भर दिला आहे. पण 2018 मध्ये, एका नवीन रिपोर्ट नुसार, कंपनी Sony Xperia XZ2 लाइन-अप अंतर्गत 2 नवीन टॅबलेट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कॅमेरा अॅप कोड च्या माध्यमातून आगामी Xperia XZ2 टॅबलेट्स बद्दल काही बातम्या येत आहेत. 

कॅमेरा अॅप कोड याचे संकेत देत आहे की सोनी कमीत कमी 2 टॅबलेट सादर करेल. एक 8 इंचाच्या डिस्प्ले सह आणि दुसर्‍यात 10 इंचाचा एक पॅनल असेल, हे दोन्ही डिवाइस एंड्रॉयड सह येतील. 

हे दोन्ही डिवाइस यावर्षी लॉन्च होऊ शकतात आणि याची घोषणा Sony Xperia XZ2 Pro सह केली जाऊ शकते, जो 2018 चा Sony चा सर्वात अडवांस स्मार्टफोन असेल. सध्यातरी या दोन्ही टॅबलेट्स च्या स्पेसिफिकेशन बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही, आम्ही एवढच सांगू शकतो की कंपनी ने जारी केलेला शेवटचा टॅबलेट Xperia Z4 Tablet एक फ्लॅगशिप डिवाइस होता. त्यामुळे, सोनी एक्सपीरिया XZ2 टॅबलेट 8.0 आणि 10 मधील कमीत कमी एक फ्लॅगशिप डिवाइस असू शकतो आणि कंपनी त्याला सॅमसंग Galaxy Tab S3 च्या प्रतिस्पर्धी च्या रुपात आणू शकते. 

आम्हाला आशा आहे की यातील कमीत कमी एक स्नॅपड्रॅगन 8xx SoC आणि एक LTE वेरियंट सिम कार्ड स्लॉट सह येईल. पण मागच्या काही वर्षांमध्ये बाजारात एंड्रॉयड सह मोठ्या डिस्प्ले वाल्या टॅबलेट च्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे अशी अपेक्षा केली जात आहे की Sony Xperia XZ2 टॅबलेट ला बाजारात जास्त प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागणार नाही. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo